Join us  

युझवेंद्र चहल अडकला लग्नाच्या बेडीत, धनश्रीसोबत घेतले सात फेरे; सोशल मीडियावर शेअर केला खास Photo

आयपीएल 2020 दरम्यान धनश्रीदेखील चहलबरोबर यूएईमध्ये उपस्थित होती. एवढेच नाही तर ती सामन्यांदरम्यान चहलच्या टीम रॉयल चॅलेन्जर्स बँगळुरूला सपोर्ट करताना दिसत होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2020 9:49 PM

Open in App

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेटर युझवेंद्र चहल आज धनश्री वर्मासोबत लग्नाच्या बेडीत अडकला. त्याने सोशल मीडियावर लग्नाचा फोटो शेअर केला आहे. या दोघांचा हा फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. युझवेंद्र चहल आणि धनश्रीचा याच वर्षी ऑगस्ट महिन्यात साखरपुडा पार पडला होता.

आयपीएल 2020 दरम्यान धनश्रीदेखील चहलबरोबर यूएईमध्ये उपस्थित होती. एवढेच नाही तर ती सामन्यांदरम्यान चहलच्या टीम रॉयल चॅलेन्जर्स बँगळुरूला सपोर्ट करताना दिसत होती. चहल आणि धनश्री यांचे चाहते दोघांच्या लग्नानंतर अत्यंत आनंदी दिसत आहेत. तसेच त्यांच्या फोटोवर कमेंट देखील करत आहेत.

कोण आहे धनश्री -धनश्री एक डॉक्टर, कोरियोग्राफर आणि यूट्यूबर आहे. धनश्री अनेक वेळा सोशल मीडियावर आपले डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर लाइक्स आणि कॉमेंट्स येत असतात. एवढेच नाही तर तिची स्वतःची डान्स कंपनीदेखील आहे. इंस्टाग्रामवरही धनश्रीचे पाच लाखांवर फॉलोअर्स आहेत.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीही भारतीय संघात होता युझवेंद्र - लेग स्पिनर युझवेंद्र चहल ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वन डे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात होता. अद्याप त्याने कसोटी क्रिकेटमध्ये डेब्यू केलेले नाही. मात्र, तो वन डे आणि टी-20 संघाचा सदस्य आहे. ऑस्ट्रेलियन दौऱ्यात भारताला टी-20 मालिका जिंकून देण्यात युझवेंद्रची महत्वाची भूमिका होती. चहलने भारतासाठी आतापर्यंत 54 वन डे आणि 45 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. चहलने वन डेमध्ये आतापर्यंत 92 तर टी20मध्ये 59 बळी मिळवले आहेत. 

टॅग्स :युजवेंद्र चहलभारतलग्न