Join us

शुभमन गिलने दिली सारा अली खानसोबत डेटिंगची कबुली, चॅट शोमध्ये हे काय बोलून गेला?

शुभमन गिलने यासंदर्भात केलेल्या भाष्यामुळे चर्चांना अधिकच हवा मिळाली आहे. एका चॅट शो दरम्यान, त्याने सारा अली खानचे केवळ कौतुकच केले नाही तर डेटिंगबद्दलही भाष्य केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 16:42 IST

Open in App

क्रिकेट आणि बॉलीवूडमधील लव्ह स्टोरीज काही नवीन नाहीत. सध्या शुभमन गिल आणि सारा अली खान यांच्या डेटिंग संदर्भात जोरदार गॉसिप सुरू आहे. यातच आता, शुभमन गिलने यासंदर्भात केलेल्या भाष्यामुळे, या चर्चांना अधिकच हवा मिळाली आहे. एका चॅट शो दरम्यान, त्याने सारा अली खानचे केवळ कौतुकच केले नाही तर डेटिंगबद्दलही भाष्य केले आहे.शुभमनने सांगितले सत्य? -सारा अली खान आणि शुभमन गिल रिसेंटली एका फ्लाइटमध्ये सोबत दिसले होते. या पूर्वी हे दोघे एक रेस्ट्रॉन्टमध्येही दिसून आले होते. आता चॅट शो दिल दियां गल्ला दरम्यान, तो सारा अली खानला डेट करत आहे का, असे विचारण्यात आले होते.  यावर तो म्हणाला, कदाचित. यावर त्याला आणखी खोदून विचारण्यात आले, की साराचे सर्व सत्य सांग. यावर तो म्हणाला, सारा दा सारा सच बोल दिया. कदाचित हो, कदाचित नाही. 

साराचं केलं कौतुक - शो दरम्यान, आपल्या मते बॉलीवुडमधील सर्वात फीट अॅक्ट्रेस कोण आहे? असा प्रश्न केला असता, शुभमन म्हणाला सारा. शुभमनच्या या उत्तरानंतर, या दोघांसंदर्भातील चर्चांना आणखी उधान आले आहे. 

खरे तर, यापूर्वी शुभमन गिलचे नाव सचिन तेंदुलकरची मुलगी सारा सोबतही जोडले गेले आहे. शुभमनच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या एका क्रिकेटर मित्रानेही सारासोबतच्या कनेक्शनसंदर्भात हिंट दिली होती. त्याने शुभमनला शुभेच्छा देताना 'बहुत SARA प्यार', असे लिहिले होते.  

टॅग्स :सारा अली खानबॉलिवूडऑफ द फिल्ड
Open in App