Join us

भारताच्या 'या' क्रिकेटपटूने जाहीर केलं आपलं प्रेम, लवकरच अडकणार विवाहबंधनात

आपल्या तडाखेबाज फलंदाजीने ओळखल्या जाणाऱ्या संजू सॅमसन याने पाच वर्षांनंतर आपले प्रेम जाहीर केले. केरळचा हा खेळाडू लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 14:57 IST

Open in App

मुंबई - आपल्या तडाखेबाज फलंदाजीने ओळखल्या जाणाऱ्या संजू सॅमसन याने पाच वर्षांनंतर आपले प्रेम जाहीर केले. केरळचा हा खेळाडू लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. सॅमसनने रविवारी लग्नाची घोषणा केली. यावर्षी डिसेंबर महिन्यात कॉलेजमधील मैत्रीणीसोबत तो लग्न करणार आहे. 23 वर्षीय सॅमसनने फेसबुकवरून ही घोषणा केली. 

त्याने आपली होणारी पत्नी चारू हिच्यासोबत फेसबुकवर एक फोटो पोस्ट केला. त्यावर त्याने लिहिले की,''22 ऑगस्टला राक्षी 11 वाजून 11 मिनिटांनी मी तिला 'Hi' मेसेज पाठवला होता. आमच्या प्रेमाला पाच वर्ष झाली आहेत आणि ही पाच वर्षे मी तिच्यासोबतचा फोटो शेअर करण्याची प्रतीक्षा करत होतो. मला जगाला सांगायचे होते, की ही माझी प्रेयसी आहे.''सॅमसनने पुढे लिहिले की,''आम्ही बराच वेळ एकत्र घालवला, परंतु सार्वजनिक ठिकाणी आम्हाला एकत्र कधीच फिरता येत नव्हते. पण, आजपासून आम्ही ते करू शकतो. या नात्याला सहमती देणाऱ्या आमच्या पालकांचे आभार.'' चारूचे वडील बी. रमेश कुमार एक वरिष्ठ पत्रकार आहेत आणि त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार चारू आणि सॅमसन यांचे लग्न 22 डिसेंबरला होणार आहे.

सॅमसनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 73 सामन्यांत 2602 धावा केल्या आहेत. त्यात 9 शतकं आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याची सर्वोत्तम खेळी ही 211 धावांची आहे. लिस्ट A क्रिकेटमध्ये त्याने 66 सामन्यांत 11 अर्धशतकांसह 1664 धावा केल्या आहेत. तसेच 124 स्थानिक टी-20 सामन्यांत त्याच्या नावावर 3011 धावा आहेत. त्याने भारतीय संघाकडून एकमेव टी-20 सामना खेळला आहे. 

टॅग्स :भारतक्रिकेट