Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोहित शर्माने वांद्र्यातील दोन अपार्टमेंट्स दिल्या भाड्याने, महिन्याला मिळणार इतके पैसे

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा काही कारणामुळे चर्चेत आलाय. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 13:22 IST

Open in App

Rohit Sharma : येत्या २५ जानेवारीपासून भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) या दोन संघांमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेमुळे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा व्यस्त असल्याचे पाहायला मिळते आहे. भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी रोहित शर्मा सज्ज झालाय. पण सध्या रोहित शर्मा त्याच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आलाय. 

त्याआधीच क्रिकेटर रोहित शर्माच्या आपार्टमेंटसंदर्भात माहिती समोर येत आहे. Zapkey.com नुसार, रोहित शर्माने त्याचे बांद्रा पश्चिम येथील त्याच्या दोन अपार्टमेंट  भाड्याने दिल्या आहेत. भाडेकरुसोबत रोहितने तीन वर्षासाठी करार केला आहे. 

Zapkey.com ने दिलेल्या माहितीनूसार रोहित शर्माला या अपार्टमेंटचे महिन्याला ३.१ लाख रुपये इतके भाडे मिळणार आहे. पहिल्या वर्षी प्रतिमहिना ३.१ लाख रुपये तर दुसऱ्यावर्षी यामध्ये वाढ होऊन ३.२५ लाख आणि तिसऱ्या वर्षी ३.४१ लाख प्रतिमहिना भाडे मिळणार आहे. 

एकंदरीत १४ व्या मजल्यावरील १०४७ चौरस फूट (६१६आणि ४३१) आकाराची इतकी मोठी अपार्टमेंट त्याने भाडेतत्वावर दिली आहे. दरम्यान, रोहित शर्माने २०२२ मध्ये हीच दोन अपार्टमेंट प्रतिमहिना २.५ लाख रुपयांनी भाड्याने दिली होती. सध्या रोहितने करार केलेल्या  या दोन अपार्टमेंटसाठी रोहित शर्माला एकूण ९.३  लाख रुपये इतके डिपॉझिट मिळाले.

टॅग्स :रोहित शर्माभारतीय क्रिकेट संघ