Join us  

Corona Virus : धवनने लॉकडाऊनचा नियम मोडला; पोलिसांनी पावती फाडली

देशात कोरोना व्हायरसचे 5000 हून अधिक रुग्ण आढळले आहेत.   

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 2:26 PM

Open in App

कोरोना व्हायरसमुळे  देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे गरज असल्यास घराबाहेर पडा, असे आवाहन केले जात आहे. पण, भारतीय क्रिकेटपटूकडूनच लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा प्रकार घडला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये भारतीय क्रिकेटपटू रिषी धवननं लॉकडाऊनचा नियम मोडला. टाईम्स ऑफ इंडियानं हे वृत्त प्रसिद्ध केले. लॉकडाऊन असताना रिषी धवन खाजगी वाहनानं बाहेर पडला होता आणि पोलिसांनी त्याला अडवून पावती फाडली.

हिमाचल प्रदेशमध्ये सकाळी 10 ते दुपारी 1 वाजण्याच्या सुमारस धवन गाडी घेऊन घराबाहेर पडला होता, परंतु त्याच्याकडे पास नसल्यानं पोलिसांनी त्याच्याकडून 500 रुपयांची पावती फाडली. तो बँकेत जात होता. धवनने भारताकडून 2016मध्ये तीन वन डे आणि एक ट्वेंटी -20 सामना खेळला आहे. हिमाचल प्रदेशकडून तो स्थानिक क्रिकेटमध्ये खेळतो. धवननं 79 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 3702 धावा आणि 308 विकेट्स घेतल्या आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये 96 सामन्यांत त्याच्या नावावर 125 विकेट्स आहेत.

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये त्यानं किंग्स इलेव्हन पंजाब, कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. 2017पासून तो एकही ट्वेंटी-20 सामना खेळलेला नाही.

अऩ्य महत्त्वाच्या बातम्या

Good News : IPL 2020 होणार; BCCI नं तयार केला 'मास्टर प्लान'!

Corona Virus : IPL चॅम्पियन संघाची कोट्यवधींची मदत; अन्य संघ घेणार का आदर्श?

Corona Virusचा मुकाबला करण्यासाठी डॉक्टरच नव्हे, तर खेळाडूही आले मदतीला

अजिंक्य रहाणेच्या चिमुकलीला 'लॉकडाऊन' कळतं, तुम्हाला कधी कळणार? पाहा Cute Video

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याभारतीय क्रिकेट संघ