Corona Virus : अजिंक्य रहाणेच्या चिमुकलीला 'लॉकडाऊन' कळतं, तुम्हाला कधी कळणार? पाहा Video

अजिंक्यची पत्नी राधिकानं मुलगी आर्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 02:13 PM2020-04-10T14:13:51+5:302020-04-10T14:24:26+5:30

whatsapp join usJoin us
Corona Virus : Even Aarya knows StayHome StaySafe; Ajinkya Rahane wife Radika Share a cute video svg | Corona Virus : अजिंक्य रहाणेच्या चिमुकलीला 'लॉकडाऊन' कळतं, तुम्हाला कधी कळणार? पाहा Video

Corona Virus : अजिंक्य रहाणेच्या चिमुकलीला 'लॉकडाऊन' कळतं, तुम्हाला कधी कळणार? पाहा Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरसमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या काळात पंतप्रधान लोकांना घरातच राहण्याचं आवाहन करत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही सुरक्षिततेसाठी घरीच राहा अशी विनंती करत आहेत. पण, तरीही लोकं लॉकडाऊनला अजूनही गांभीर्यानं घेत नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या हजाराच्या आसपास पोहोचली आहे, त्यातील निम्म्याहून अधिक रुग्ण हे मुंबईतील आहेत. त्यामुळे घरी राहणे याचत सुरक्षितता आहे. अजूनही काहींना लॉकडाऊनचा अर्थ कळला नसला तरी भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या चिमुकलीला मात्र हे चांगलं कळलं आहे.

अजिंक्यची पत्नी राधिकानं मुलगी आर्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यात अजिंक्य कन्या आर्याला घराबाहेर पडायच आता, असा प्रश्न विचारतो आणि त्यावर आर्या त्वरीत नकारार्थी मान डोलावते. राधिकानं हा व्हिडीओ पोस्ट करून त्यावर लिहीलं की,'' आर्यालाही माहित्येय घरी राहा, सुरक्षित राहा.'' राधिकानं पोस्ट केलेल्या या व्हिडीओला लाखोंनी पसंती दर्शवली आहे. 

पाहा व्हिडीओ...


दरम्यान, अजिंक्यनं कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारला 10 लाखांची मदत केली आहे. कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी अनेक खेळाडूही पुढे आले आहेत. रोहित शर्मा, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा यांच्यासह अनेक क्रिकेटपटूंनी आपापल्या परीनं मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. 

अऩ्य महत्त्वाच्या बातम्या

Good News : IPL 2020 होणार; BCCI नं तयार केला 'मास्टर प्लान'!

Corona Virus : IPL चॅम्पियन संघाची कोट्यवधींची मदत; अन्य संघ घेणार का आदर्श?

Corona Virusचा मुकाबला करण्यासाठी डॉक्टरच नव्हे, तर खेळाडूही आले मदतीला

Web Title: Corona Virus : Even Aarya knows StayHome StaySafe; Ajinkya Rahane wife Radika Share a cute video svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.