Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo

Nitish Rana Saachi Marwah Twin Baby: १४ जूनला साचीने जुळ्या मुलांना जन्म दिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 16:32 IST2025-06-18T16:28:25+5:302025-06-18T16:32:00+5:30

whatsapp join usJoin us
Indian cricketer Nitish Rana becomes father of twin boys wife Saachi Marwah shares post | Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo

Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Nitish Rana Saachi Marwah Twin Baby: भारतीय क्रिकेटपटू नितीश राणाची पत्नी साची मारवाह हिने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. नितीश राणा-साची मारवाह ही जोडी जुळ्या मुलांचे आई-बाबा झाले आहेत. त्यांनी ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. भारतीय क्रिकेट संघासाठी फारच छोटी कारकीर्द असलेला नितीश IPL च्या नुकत्याच पार पडलेल्या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळला. नितीश राणा आणि साची मारवाह यांनी पोस्ट शेअर करून त्यांना जुळे झाल्याची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, १४ जून रोजी साचीने जुळ्या मुलांना जन्म दिला. यासोबतच त्यांनी मुलांच्या लहानशा बोटांचा फोटोही शेअर केला.


नितीशने १८ फेब्रुवारी २०१९ रोजी साचीशी लग्न केले. साची ही एक इंटीरियर डिझायनर होती आणि ती कॉमेडियन अभिषेक कृष्णाची चुलत बहीण आहे. ऋषभ पंतची बहीण साक्षी पंतने या जोडप्याचे अभिनंदन केले आणि लिहिले, "आम्हाला आनंद देणाऱ्या छोट्याशा जीवाच्या आगमनाबद्दल अभिनंदन. मी या मुलांची खूप चांगली मामी होईल असे प्रॉमिस करते. याशिवाय, वेंकटेश अय्यर, पियुष चावला, राहुल तेवतिया, रमणदीप सिंग अशा सर्वच क्रिकेटपटूंनी नितीशला नव्या इनिंगसाठी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.


दरम्यान, २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या नितीशने फक्त एक एकदिवसीय आणि २ टी२० सामने खेळले. जुलैमध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याने तीन सामने खेळले. त्याने १ एकदिवसीय सामन्यात ७ धावा आणि २ टी२० डावात १५ धावा केल्या. त्यानंतर तो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. त्याने ५४ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २९५४ धावा आणि ७८ लिस्ट ए सामन्यांमध्ये २२८१ धावा केल्या. आयपीएलमध्ये त्याने ३ वेगवेगळ्या संघांसाठी एकूण ११८ सामने खेळले. नितीशने २०१६ मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळून आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांच्याकडून २ हंगाम खेळल्यानंतर तो ७ हंगाम केकेआरकडून खेळला. २०२५ पूर्वी KKRने त्याला रिलीज केले. त्यानंतर राजस्थान रॉयल्सने त्याला विकत घेतले. नितीश राणाने राजस्थानकडून खेळलेल्या ११ सामन्यांमध्ये २१७ धावा केल्या, ज्यामध्ये २ अर्धशतकांचा समावेश होता.

Web Title: Indian cricketer Nitish Rana becomes father of twin boys wife Saachi Marwah shares post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.