Join us

भारतीय क्रिकेटपटूने साजरा केला 'चार पायांच्या मुलाचा' वाढदिवस; तुम्ही फोटो पाहिलेत?

मनोज तिवारी मैदानातील रोमँटिक अंदाजामुळे नुकताच चर्चेत आला होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 17:46 IST

Open in App

भारतीय क्रिकेटपटू आणि बंगालचे क्रीडा मंत्री मनोज तिवारी सध्या रणजी ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी केल्यानंतर आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. अलीकडेच त्याने पत्नी आणि मित्रांसोबत आपल्या कुटुंबातील खास व्यक्तिचा वाढदिवस साजरा केला. आपल्या 'चार पायांच्या मुलाचा' वाढदिवस साजरा केल्याचे फोटो त्याने पोस्ट केले. त्याने नक्की कोणाचा वाढदिवस साजरा केला हे तुमच्या लक्षात आलं असेलच. मनोज तिवारीची पत्नी सुष्मिताने त्यांचा पाळीव कुत्रा वूफ याच्या सातव्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. तू आमच्या आयुष्यात येऊन सात वर्षं झाली आणि ती आनंदात गेली. तुम्ही सात या क्रमांकाला आणखी भाग्यवान बनवलेत. माझ्या चार पायांच्या मुलाला वाढदिवसाच्या शुभेच्छा, असेही त्याच्या पत्नीने दिल्या.

वूफच्या वाढदिवशी ज्या चित्रांमध्ये त्याने आपल्या पाळीव कुत्र्याचे नाव लिहिले होते त्यात अतिशय सुंदर सजावट दिसत आहे. संपूर्ण घर अतिशय सुंदर सजवले होते. मनोज तिवारीशिवाय त्याचे मित्रही वूफसोबत वेळ घालवताना दिसले.

जेव्हा मनोज तिवारीने रणजी ट्रॉफी दरम्यान आपले दुसरे शतक झळकावले होते तेव्हा त्याने ते शतक अतिशय रोमँटिक पद्धतीने आपल्या पत्नीला समर्पित केले होते. त्याने एक खास चिठ्ठी लिहीली होती. ती चिठ्ठी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. त्या स्लिपमध्ये तिवारीने हार्टचा फोटो काढला होता. यासोबतच त्याने पत्नी सुष्मिता आणि मुलांची नावेही लिहिली होती. मनोज तिवारीने २०१३ मध्ये सुष्मिता रॉय हिच्यासोबत लग्न केले. त्यांची लव्हस्टोरीही खूप रोमँटिक आहे. दोघांनी लग्नाआधी जवळपास सात वर्षे डेट केले होते.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघपश्चिम बंगाल
Open in App