Join us

दिनेश कार्तिक बनला 'बाप' माणूस, पत्नीनं जुळ्या मुलांना दिला जन्म; जाणून घ्या, काय ठेवली नावं?

कार्तिकने सोशल मीडियावर आपल्या जुळ्या मुलांसह स्वत:चा, पत्नी दीपिका पल्लीकलचा आणि डॉगीचा फोटो शेअर करत, आता आम्ही 3 ते 5 झालो आहोत, असे म्हटले आहे. यासोबतच कार्तिकने आपल्या दोन्ही मुलांची नावंही सांगितली आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 23:53 IST

Open in App

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला (Dinesh Karthik) आज पुत्र रत्न झाले. त्याची पत्नी दीपिका पल्लीकलने (Dipika Pallikal) जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. कार्तिकने सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी दिली. तसेच त्याने पत्नी आणि दोन्ही मुलांसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. कार्तिकची पत्नी दीपिका स्क्वॅश प्लेयर आहे.

कार्तिकने सोशल मीडियावर आपल्या जुळ्या मुलांसह स्वत:चा, पत्नी दीपिका पल्लीकलचा आणि डॉगीचा फोटो शेअर करत, आता आम्ही 3 ते 5 झालो आहोत, असे म्हटले आहे. यासोबतच कार्तिकने आपल्या दोन्ही मुलांची नावंही सांगितली आहेत. कार्तिकच्या एका मुलाचे नाव कबीर पल्लीकल कार्तिक (Kabir Pallikal Karthik) आणि दुसऱ्या मुलाचे नाव झिआन पल्लीकल कार्तिक (Zian Pallikal Karthik), असे आहे.

KKR नं केलं अभिनंदन - दिनेश कार्तिक पिता झाल्यानंतर त्याचा आयपीएल संघ कोलकाता नाइट रायडर्सने त्याचे ट्विट करून अभिनंद केले आहे. केकेआरने लिहिले आहे, "दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकलचे दोन सुंदर जुडवा मुलांचे आई-बाबा झाल्याबद्दल खूप-खुप अभिनंदन. आपल्या नाइट रायडर्सचे कुटुंब थोडे आणखी मोठे झाले आहे.

2015 मध्येच केले होते लग्न -दीपिका पल्लीकल ही दिनेश कार्तिकची दुसरी पत्नी आहे. कार्तिकने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर 2015मध्ये स्क्वॅश प्लेयर दीपिका पल्लिकलसोबत लग्न केले होते.

टॅग्स :दिनेश कार्तिकभारतीय क्रिकेट संघ
Open in App