मुंबई - आयसीसी महिला टी-20 स्पर्धा अवघ्या पाच महिन्यांहून कमी कालावधी असताना भारतीय महिला क्रिकेट संघाला धक्का देणारी घटना घडली. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक तुषार आरोठे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
![]()
गत महिन्यात आशिया चषक टी-20 स्पर्धेच्या अंतिम लढतीत बांगलादेशकडून झालेल्या पराभवानंतर भारतीय संघासोबत उडालेल्या खटक्यांवरून आरोठे यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. मात्र, आरोठे यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे. संघाच्या हितासाठी काही खेळाडूंना त्यांच्या कंफर्ट झोनमधून बाहेर येण्याचा सल्ला दिला होता, त्यावरूनही खेळांडूंबरोबरचे संबंध बिघडल्याचे त्यांनी सांगितले.