Join us

इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी

टी २० मालिकेची सुरुवात २८ जून पासून होणार असून वनडे मालिकेतील पहिला सामना हा १६ जुलैला नियोजित आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 19:43 IST

Open in App

भारतीय नियामक मंडळाने (BCCI)  इंग्लंड विरुद्धच्या आगामी वनडे आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. भारतीय महिला संघ ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेसह इंग्लंड दौऱ्याची सुरुवात करणार आहे. त्यानंतर भारत इंग्लंड यांच्यात ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात येईल. टी २० मालिकेची सुरुवात २८ जून पासून होणार असून वनडे मालिकेतील पहिला सामना हा १६ जुलैला नियोजित आहेत.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

अखेर लेडी सेहवागची प्रतिक्षा संपली, इंग्लंड दौऱ्यावर मिळाली संधी

इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व हे हरमनप्रीत कौरकडे असून स्मृती मानधना उपकर्णधार आहे. इंग्लंड दौऱ्यावर संघात जो सर्वात मोठा बदल झालाय तो म्हणजे लेडी सेहवाग अर्धात शफाली वर्माची भारतीय महिला संघात एन्ट्री झाली आहे. तिच्याशिवाय सयाली सतघरे हिलाही टी-२० मध्ये संधी देण्यात आली आहे. वनडेत  श्री चरणी, शुची उपाध्याय, क्रांतीसह, अमनजोत कौर आणि स्नेह राणा यांना संधी मिळालीये.

इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन​​​​​​​महिला वनडे वर्ल्ड कपच्या दृष्टिने महत्त्वाचा दौरा

आगामी महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारतीय महिला संघासाठी इंग्लंडचा दौरा महत्त्वपूर्ण असेल. इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या संघातूनच घरच्या मैदानात रंगणाऱ्या महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ निश्चित केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दौऱ्यात हरमन ब्रिगेड कशी कामगिरी करणार ते पाहण्याजोगे असेल.

टी २० साठी भारतीय महिला संघ 

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उप कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिंग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हरलीन देओल, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरणी, शुचि उपाध्याय, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड़, सयाली सतघरे.

वनडेसाठी भारतीय महिला संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उप कर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), तेजल हसब्निस, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरणी, शुचि उपाध्याय, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, सयाली सतघरे. 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध इंग्लंडभारत विरूद्ध इंग्लंड २०२५