Join us  

'गदाधारी विराट', भारतीय संघाला मिळणार 10 लाख डॉलर 

10 लाख डॉलर म्हणजे जवळजवळ 65 कोटींची कमाई भारताने 2017-18 च्या सत्रात केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2018 12:33 PM

Open in App

नवी दिल्ली -  भारतीय संघाला आयसीसीकडून 10 लाख डॉलरचे बक्षिस देण्यात येणार आहे. आयसीसीच्या मानांकनात सर्वोच्च स्थानी राहण्यासाठी आणि बक्षिसावर दावा सांगण्यासाठी 1 एप्रिल 2018 ही अंतिम मुदत आहे.  एक एप्रिल 2018 पर्यंत भारताचा संघ अव्वल स्थानावर विराजमान राहणार आहे. त्यामुळं आज आयसीसीनं भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला मानाची गदा देऊन सन्मानित केलं आहे.

भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू ग्रमी पोलॉक यांच्या हस्ते आयसीसी चॅम्पीसनशिपची मानाची गदा विराटला केपटाउन येथे देण्यात आली. त्याबरोबरच दहा लाख डॉलरचे बक्षिसही देण्यात येणार आहे. 10 लाख डॉलर म्हणजे जवळजवळ 65 कोटींची कमाई भारताने 2017-18 च्या सत्रात केली आहे. यापूर्वी बक्षिसाची ही रक्कम पाच लाख डॉलर इतकी होती. मात्र, 2015 पासून ही रक्कम 10 लाख डॉलर इतकी करण्यात आली. गेल्यावर्षीही भारतानं कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं होतं.  भारताचा माजी कर्णधार धोनी यानेही यापूर्वी दोन वेळा आयसीसीची मानाची गदा पटकावून दिली आहे. 

 2016-17 आणि 2017-18 मध्ये भारतीय संघानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याच्याबळावर सलग दोन वर्ष आयसीसीची मानाची गदा पटकवत आपलं निविर्वादित वर्चस्व स्थापित केलं आहे. विराट कोहली, जसप्रित बुमराह, रहाणे, शर्मा, भुवनेश्वर, जाडेजा, अश्विन पुजारा यांच्या सांघिक कामगिरीच्या बळावर भारताने कसोटीमध्ये अव्वल स्थान कायम राखलं आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रकेतील कसोटी मालिकेत भारताला पराभवाचा धक्का सहन करावा लागला पण त्याचा फारसा परिणाम क्रमवारीवर पडला नाही. 

आयसीसी क्रमवारी -

  1. भारत - 121
  2. दक्षिण आफ्रिका - 115 
  3. ऑस्ट्रेलिया - 104
  4. न्यूझीलंड - 100
  5. इंग्लंड - 99
  6. श्रीलंका - 95
  7. पाकिस्तान - 88
  8. वेस्ट इंडिज - 72 

 

 

टॅग्स :आयसीसीविराट कोहलीबीसीसीआयभारतीय क्रिकेट संघ