मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मंगळवारी 2018 या वर्षाचा वन डे व कसोटी संघ जाहीर केला आणि त्या संघांचे नेतृत्व कोहलीच्या खांद्यावर सोपवण्यात आले आहे. वन डे संघात भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंचे वर्चस्व जाणवत आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या या संघात इंग्लड व भारताचे प्रत्येकी चार खेळाडू आहेत. कसोटी संघात भारतासह न्यूझीलंडच्या खेळाडूंचा दबदबा जाणवत आहे.
आयसीसीच्या वन डे क्रमवारीत इंग्लंड व भारत हे संघ अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे 2018च्या संघात त्यांचे वर्चस्व असणे साहजिकच होते. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने 2018मध्ये 14पैकी 9 सामने जिंकले आहेत. इंग्लंडसाठीही 2018 हे वर्ष विशेष राहिले. त्यांनी 24पैकी 17 सामन्यांत विजय मिळवले आहेत. या संघात न्यूझीलंड, बांगलादेश आणि अफगाणिस्तानच्या खेळाडूंनीही स्थान पटकावले आहे.
भारताचे शिलेदार...विराट कोहलीविराट कोहलीने 2018 मध्ये अनेक विक्रम मोडले. महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा सर्वात जलद 10000 धावांचा विक्रम कोहलीने स्वतःच्या नावावर केला. कोहलीने 2018 मध्ये 14 सामन्यांत 102.55च्या सरासरीने 1202 धावा केल्या. त्यात 6 शतकं आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे.
ICC चा कसोटी संघ ( फलंदाजीच्या क्रमानुसार)टॉम लॅथम ( न्यूझीलंड), दिमुथ करुणारत्ने ( श्रीलंका), केन विलियम्सन ( न्यूझीलंड), विराट कोहली ( भारत, कर्णधार), हेन्री निकोल्स ( न्यूझीलंड), रिषभ पंत ( भारत, यष्टिरक्षक), जेसन होल्डर ( वेस्ट इंडिज), कागिसो रबाडा ( दक्षिण आफ्रिका), नॅथन लियॉन (ऑस्ट्रेलिया), जसप्रीत बुमराह ( भारत), मोहम्मद अब्बास ( पाकिस्तान).
ICC चा वन डे संघ ( फलंदाजीच्या क्रमानुसार)रोहित शर्मा ( भारत), जॉनी बेअरस्टो ( इंग्लंड), विराट कोहली ( भारत, कर्णधार), जो रूट ( इंग्लंड), रॉस टेलर ( न्यूझीलंड), जोस बटलर ( इंग्लंड, यष्टिरक्षक), बेन स्टोक्स ( इंग्लंड), मुस्ताफिजूर रहमान ( बांगलादेश), रशिद खान ( अफगाणिस्तान), कुलदीप यादव ( भारत), जसप्रीत बुमराह ( भारत).