सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी-२० मालिका २-१ अशी खिशात घातली. या दिमाखदार मालिका विजयासह भारतीय संघाने १२ वर्षांपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धचा आपला दबदबा कायम ठेवला. ऑस्ट्रेलियाचं मैदान मारत भारतीय संघाने घरच्या मैदानात रंगणाऱ्या २०२६ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत कमी पडणार नाही, याची हमीच दिली आहे. ऑस्ट्रेलियातील मालिका विजयानंतर सूर्यकुमार यादवनं आगामी मेगा इवेंटच्या तयारीसंदर्भात मोठं वक्तव्य केले. वर्ल्ड कपसाठी संघ निवड करताना भारतीय संघासमोर कोणती डोकेदुखी आहे, ही गोष्ट त्याने बोलून दाखवली आहे. जाणून घेऊयात तो नेमकं काय म्हणाला त्यासंदर्भातील सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिका विजयानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला की, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडसारख्या संघाविरुद्ध खेळणं हे आगामी टी-२० वर्ल्ड कपच्या दृष्टीने टीम इंडियासाठी एक चांगली तयारी असेल. संघातील अनेक खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ निवडणं मोठी डोकेदुखी असेल. पण ते चांगलं आहे. घरच्या मैदानावर खेळताना दबाव असला तरी प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा मिळतो, असे सांगत महिला संघाप्रमाणे आम्हीही जेतेपद पटकावू असा विश्वासही त्याने व्यक्त केला आहे. वर्ल्ड कप स्पर्धेला अजून वेळ आहे. त्याआधी भारतीय संघासमोर दोन आव्हानात्मक मालिका आहेत. (दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड). यादरम्यान खूप काही शिकायला मिळेल, असेही तो म्हणाला.
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
सर्वांनी मिळून लिहिली कमबॅकची स्क्रिप्ट, कॅप्टन सूर्यानं वॉशिंग्टनच्या 'सुंदर' कामगिरीचाही केला उल्लेख
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अखेरच्या सामन्याप्रमाणे पहिल्या सामन्यातही पावसाचा व्यत्यय आला होता. यावर जोर देताना तो म्हणाला की, कोणताही सामना पूर्ण खेळवला जावा, असेच वाटते. पण त्या गोष्टी आपल्या हातात नव्हत्या. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत ०-१ अशा पिछाडीवर असताना संघातील सर्वांनीच सर्वोत्तम खेळ केला. त्यामुळे कमबॅक करून ही मालिका जिंकणं सहज शक्य झाले. जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग ही कोणत्याही प्रतिस्पर्धी संघासाठी घातक ठरेल अशीच आहे. अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनीही सर्वोत्तम कामगिरी केली. यावेळी वॉशिंगटन सुंदरही सर्वोत्तम देत आहे, असे म्हणत त्याने त्याचे खास कौतुक केल्याचे पाहायला मिळाले.