नवी मुंबईच्या मैदानात भारताच्या लेकींनी दोन वेळा तुटलेले स्वप्न अखेर सत्यात उतरवलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायनलमध्ये टीम इंडियाने ५२ धावांनी विजय मिळवत पहिली वहिली वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली. साखळी फेरीतील दिमाखदार सुरुवातीनंतर सलग तीन सामन्यात अडखळल्यावर भारतीय संघ स्पर्धेत शेवटपर्यंत टिकणार नाही, असे चित्र निर्माण झाले होते. पण दमदार कमबॅक करून दाखवत टीम इंडियानं फायनल गाठली. या सामन्यातही पहिल्यांदा फलंदाजी करताना चांगली सुरुवात करून टीम इंडियाला ही लढाई ३०० पारची करता आली नाही. त्यात २९९ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा आणि ब्रिट्स जोडी जमली आणि या दोघींनी टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं होतं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आजी रुग्णालायत नातं देशासाठी उतरली मैदानात
भारताच्या ताफ्यातील अष्टपैलू अमनजोत कौरनं रॉकेट थ्रोसह दक्षिण आफ्रिकेची सलामीची जोडी फोडली. ब्रिट्सला तिने धावबाद केले. एवढेच नाही तर शतकी खेळीसह टीम इंडियाच्या विजयात अडथळा बनून उभी राहिलेल्या लॉराचा कॅचही अमनजोत कौर हिनेच पकडला. तिने फिल्डिंगच्या जोरावर फायनलचा खेळच फिरवला. एका बाजूला ती देशासाठी मैदानात उतरुन सर्व काही झोकून देत सर्वोत्तम कामगिरी करून दाखवत होती. दुसऱ्या बाजूला तिच्या आयुष्यातील सर्वात प्रिय व्यक्ती म्हणजे तिच्या आजी रुग्णालयात उपचार सुरु होते. लेक वर्ल्ड चॅम्पियन झाल्यावरच अमनजोत कौरच्या वडिलांनी यासंदर्भात खुलासा केला आहे.
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
आजीसोबत खास बाँडिंग
इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमनजोत कौरचे वडील भूपिंदर सिंग यांनी ७५ वर्षीय आई भगवंती यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ते म्हणाले की, अमनजोत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फायनल खेळणार असल्यामुळे आम्ही तिला याबद्दल काहीच कळवलं नाही. तिचं लक्ष विचलित करायचं नव्हते. घरात चिंतेचे वातावरण असताना भारतीय संघाचा विजय हा दिलासा देणारा आहे. अमनजोतचं आजीसोबत असणाऱ्या खास बाँडिंगची गोष्टही त्यांनी शेअर केलीय. जेव्हापासून अमनजोत कौर क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा आजीच तिच्यासोबत असायची. रुग्णालयात असलेल्या आजीला नातीच्या कामगिरीबद्दलची माहिती देतो, अशी गोष्टही त्यांनी सांगितली.