Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND W vs SA W: डब्लूपीएलनंतर भारताच्या रणरागिणी बलाढ्य द.आफ्रिकेशी भिडणार; टी-२० मालिकेचे वेळापत्रक जाहीर!

India Womens Tour of South Africa Announced: डब्लूपीएल संपल्यानंतर लगेचच भारतीय महिला क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. आगामी टी-२० विश्वचषकाच्या तयारीसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 16:32 IST

Open in App

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या चाहत्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. विमेन्स प्रीमियर लीगचा थरार संपल्यानंतर भारतीय महिला संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने या दौऱ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले असून, यामध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे.

ही मालिका दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. जून २०२६ मध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी महिला टी-२० विश्वचषकापूर्वीची ही शेवटची अधिकृत मालिका असेल. विशेष म्हणजे, विश्वचषकाच्या गट-१ मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका एकाच गटात आहेत, त्यामुळे या मालिकेतील कामगिरी दोन्ही संघांचा आत्मविश्वास वाढवणारी ठरेल.

"भारतासारख्या संघाविरुद्ध खेळल्यामुळे आमच्या संघाला स्वतःची चाचणी घेण्याची आणि उणिवा सुधारण्याची उत्तम संधी मिळेल", असे सीएसएचे संचालक एनॉक एनक्वे यांनी म्हटले आहे. तर, सीएसएचे सीईओ फोलेत्सी मोसेकी यांनी म्हटले आहे की, "भारताचे यजमानपद भूषवताना आम्हाला अभिमान वाटतोय. ही मालिका जागतिक दर्जाची असेल आणि यामुळे महिला क्रिकेटचा प्रसार होण्यास मदत होईल.

भारतीय महिला संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा: टी-२० मालिकेचं वेळापत्रक

सामनातारीखमैदानशहर
पहिला सामना१७ एप्रिल २०२६किंग्जमीड क्रिकेट ग्राउंडडर्बन
दुसरा सामना१९ एप्रिल २०२६किंग्जमीड क्रिकेट ग्राउंडडर्बन
तिसरा सामना२२ एप्रिल २०२६वँडरर्स स्टेडियमजोहान्सबर्ग
चौथा सामना२५ एप्रिल २०२६वँडरर्स स्टेडियमजोहान्सबर्ग
पाचवा सामना२७ एप्रिल २०२६विलोमूर पार्कबेनोनी
टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाऑफ द फिल्ड