न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्याआधी रिषभ पंत दुखापतग्रस्त झाला आहे. टी-२० पाठोपाठ वनडे सामन्यात भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणं आव्हानात्मक झाले असताना पंतला 'थ्रो-डाउन'चा फटका बसला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना वडोदरा येथील बीसीएच्या स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्याआधी नेट्समध्ये सराव करताना पंत जायबंदी झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुखापतीमुळे तो न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेला मुकणार असल्याचे वृत्तही समोर आले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
IANS नं सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या आगामी वनडे मालिकेतून भारताचा विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंतने माघार घेतली आहे. वडोदरा येथे पहिल्या सामन्यापूर्वी नेट्समध्ये सराव करत असताना त्याच्या उजव्या बाजूच्या स्नायूला दुखापत झाली असून या दुखापतीमुळे पंतला मालिकेला मुकणार आहे.
पंत संघात असता तरी...
रिषभ पंत याने ऑगस्ट २०२४ मध्ये आपला शेवटचा वनडे सामना खेळला होता. तो बराच काळ दुखापतीचा सामना करत आहे. इंग्लंड दौऱ्यावरही त्याला दुखापत झाली होती. देशांतर्गत विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत तो दिल्ली संघाचे नेतृत्व करतानादिसला. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेसाठी पंतला भारतीय संघात स्थान मिळाले तरी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळवणे त्याच्यासाठी आव्हानात्मक होते. कारण वनडे संघात केएल राहुल हा विकेट किपर बॅटरच्या रुपात पहिली पसंती आहे.
"माझ्या नशिबात जे लिहिलं आहे, ते…" टी-20 संघातून डच्चू दिल्याबद्दल गिल पहिल्यांदाच मनातलं बोलला!
रिषभ पंतला नेमकी दुखापत झाली तरी कशी?
रिषभ पंतच्या दुखापतीसंदर्भात जी माहिती समोर आली आहे त्यानुसार, नेट्समध्ये सराव करत असताना थ्रो-डाउन स्पेशलिस्ट समोर फलंदाजी करत असताना पंत जखमी झाला. एक चेंडू त्याच्या कंबरेच्या थोडा वरच्या भागाला लागला. चेंडू लागल्यावर त्याने मैदान सोडले. त्याआधी त्याने जवळपास ५० मिनिटे फलंदाजीचा सराव केला होता. बीसीसीआयने त्याच्या दुखापतीसंदर्भात अधिकृतरित्या कोणतीही माहिती दिलेली नाही.
KL राहुलसोबत पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणं मुश्किल
भारतीय वनडे संघात कमबॅक करण्यासाठी पंतसमोर लोकेश राहुलचं मोठ आव्हान आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत शुभमन गिल आणि श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत लोकेश राहुलनं संघाचे नेतृत्व केले होते. एवढेच नाही तर तो विकेट मागची जबाबदारीही पार पाडताना दिसले होते. या मालिकेतच लोकेश राहुलनं वनडेतील आपली जागा अधिक भक्कम केली आहे.