आकाश नेवे : भारतीय कर्णधार विराट कोहली याने आज वेस्ट इंडिज् विरोधात खेळताना शानदार अर्धशतक झळकावले. त्यासोबत विराटने सचिन तेंडुलकर आणि नवज्योतसिंग सिद्धू यांच्या एका कामगिरीची बरोबरी केली आहे. विश्वचषक स्पर्धेत सलग चार
सामन्यात भारताकडून सलग ५० पेक्षा जास्त धावा त्याने केल्या. सचिन याने २००३ आणि १९९६ च्या विश्वचषकात ही कामगिरी केली होती. तर नवज्योत सिंग सिद्धू याने १९८७ च्या विश्वचषकात ही कामगिरी केली होती. त्याची बरोबरी विराटने आज केली. भारताकडून अशी कामगिरी करणारे हे तिघेच आहेत.
![]()
विराट कोहली - २०१९ विश्वचषक
धावा विरोधी संघ
७२ वि. वेस्ट इंडिज्
६७ वि. अफगाणिस्तान
७७ वि. पाकिस्तान
८२ वि. ऑस्ट्रेलिया
सचिन तेंडुलकर
२००३ विश्वचषक
८१ वि. झिम्बाब्वे
१५२ वि. नामिबिया
५० वि.इंग्लंड
९८ वि. पाकिस्तान
१९९६ विश्वचषक
१२७ वि. केनिया
७० वि. वेस्ट इंडिज
१३७ वि. श्रीलंका
नवज्योत सिंग सिद्धू
७३ वि. ऑस्ट्रेलिया
७५ वि. न्युझिलंड
५१ वि. ऑस्ट्रेलिया
५५ वि. झिम्बाब्वे
![]()
वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात भारताचा कर्णधार निराट कोहली शतक झळकावेल, असे वाटत होते. पण कोहलीला यावेळी ७२ धावांवर समाधान मानावे लागले. पण या अर्धशतकासह कोहलीने भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा २७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.
कोहलीचे या विश्वचषकातील हे सलग चौथे अर्धशतक ठरले. या खेळीसह कोहली भारताचा सलग चार अर्धशतके लगावणारा पहिला कर्णधार ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम अझरच्या नावावर होता. अझरने १९९२ साली झालेल्या विश्वचषकात सलग तीन अर्धशतके लगावली होती. आता हा विक्रम कोहलीच्या नावावर असेल.
विराट कोहलीचा नवा विश्वविक्रम; सचिन, लारा या दिग्गजांना सोडले मागे
भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. हा विश्वविक्रम रचताना कोहलीने सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा या दोन्ही माजी महान खेळाडूंना मागे टाकले आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात कोहलीने अर्धशतक झळकावले. या सामन्यात अर्धशतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला. कारण बाद झालेल्या भारताच्या तिन्ही फलंदाजांना अर्धशतक झळकावता आलेले नाही. त्यामुळे या अर्धशतकाबरोबर कोहलीने नवा विश्वविक्रम रचला आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत कोहलीनं वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 11 हजार धावा करण्याचा विक्रम नावावर केला होता. आता त्याला सर्वात जलद 20 हजार आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम नावावर करून सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा या महान फलंदाजांना मागे टाकले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 हजार धावा करणारा कोहली जगातील बारावा, तर तेंडुलकर ( 34357) आणि राहुल द्रविड ( 24208) यांच्यानंतर तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. कोहलीच्या नावावर वन डेत 11020, कसोटीत 6613 आणि ट्वेंटी-20 2263 धावा आहेत.
तेंडुलकर आणि लारा यांनी सर्वात कमी म्हणजे 453 डावांत 20 हजार आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. या सामन्यापूर्वी कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 415 डाव ( 131 कसोटी, 222 वन डे आणि 62 ट्वेंटी-20) फलंदाजी केली आहे. त्यात त्याच्या नावावर 19896 धावा होत्या. तेंडुलकर आणि लारा यांच्यानंतर या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर रिकी पाँटिंगचा ( 468) नंबर येतो. पण आता कोहली या यादीमध्ये अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे, कारण २० हजार आंतरराष्ट्रीय धावा ४१६ सामन्यांमध्ये पूर्ण केल्या आहेत.