मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019, भारत वि. वेस्ट इंडिज : विजयी मालिका कायम राखण्यासोबतच उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित करण्याच्या निर्धाराने भारतीय संघ आज वेस्ट इंडिजचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. भारतीय संघाने पाच सामन्यांत चार विजय मिळवले आहेत, तर एक सामना पावसामुळे रद्द झालेला आहे. 9 गुणांसह तिसऱ्या स्थानावर असलेला भारतीय संघ आजच्या लढतीत विजय मिळवून उपांत्य फेरीच्या अधिक नजीक पोहोचणार आहे. विंडीजचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे, परंतु जाता जाता बलाढ्य संघांना धक्का देण्याची धमक ते दाखवू शकतात.
खेळपट्टीचा अंदाजया मैदानावर आतापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेचे तीन सामने झालेत आणि प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने बाजी मारलेली आहे. सुर्यप्रकाश असल्याने खेळपट्टी फलंदाजांना मदत करणारी असणार आहे. फिरकीपटूंना थोडी साथ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरेल.
हेड-टू-हेडएकूण सामने 126भारत विजयी 59विंडीज विजयी 62टाय : 2 अनिर्णित : 3