Join us

IND vs WI T20I Series Schedule : यंगिस्तान ट्वेंटी-२० मालिकेसाठी सज्ज; उद्यापासून रंगणार थरार, पाहा संपूर्ण वेळापत्रक

IND vs WI T20I Series Schedule : भारतीय संघाने कसोटी ( १-०) व वन डे ( २-१) मालिकेत वेस्ट इंडिजवर विजय मिळवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 02:53 IST

Open in App

IND vs WI T20I Series Schedule : भारतीय संघाने कसोटी ( १-०) व वन डे ( २-१) मालिकेत वेस्ट इंडिजवर विजय मिळवला आहे. आता ट्वेंटी-२० मालिकेला गुरुवारपासून सुरूवात होणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडू या मालिकेत ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून मैदानावर उतरणार आहे. रोहित शर्मा व विराट कोहली यांना आणखी एका ट्वेंटी-२० मालिकेत संघातून विश्रांती दिली गेली आहे. बीसीसीआयने आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघबांधणीची तयारी सुरू केल्याचे हा सूचक इशारा आहे. 

गोंधळ! अम्पायरने OUT दिला, तिसऱ्या अम्पायरने Umpire Call सांगितला; तरीही फलंदाज नाबाद

वेस्ट इंडिजचे खेळाडू ट्वेंटी-२० स्पेशालिस्ट असल्याने या मालिकेत भारताच्या युवा खेळाडूंचा खरा कस लागणार आहे. कसोटी मालिका गाजवणाऱ्या यशस्वी जैस्वालसह आयपीएल २०२३ मध्ये छाप पाडणाऱ्या तिलक वर्मा ट्वेंटी-२० संघात पदार्पणाची संधी मिळणार आहे. ऋतुराज गायकवाड, जितेश शर्मा व रिंकू सिंग या आयपीएल २०२३ गाजवणाऱ्या खेळाडूंना मात्र वगळले गेले आहे, परंतु त्यांची निवड ही आशियाई स्पर्धेसाठीच्या संघात केली गेली आहे. विंडीज मालिकेत रवी बिश्नोईचे पुनरागमन होतेय, तर अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार यांच्यावर जलदगती माऱ्याची जबाबदारी सोपवली गेली आहे. इशान किशन व संजू सॅमसन या यष्टिरक्षक-फलंदाजांची निवड केली गेली.  

भारताचा ट्वेंटी-२० संघ - इशान किशन, शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव ( उपकर्णधार), संजू सॅमसन, हार्दिक पांड्या ( कर्णधार), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार  

वेस्ट इंडिजचा ट्वेंटी-२० संघ - रोव्हमन पॉवेल (कर्णधार), कायल मेयर्स (उप कर्णधार), जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शे होप, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग, ओबेद मॅककॉय, निकोलस पूरन, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, ओशान थॉमा. 

ट्वेंटी-२० मालिकापहिली ट्वेंटी-२० - ३ ऑगस्ट, त्रिनिदाद ( वेळ रात्री ८ वाजल्यापासून)दुसरी ट्वेंटी-२० - ६ ऑगस्ट, गयाना ( वेळ रात्री ८ वाजल्यापासून) तिसरी ट्वेंटी-२० - ८ ऑगस्ट, गयाना ( वेळ रात्री ८ वाजल्यापासून) चौथी ट्वेंटी-२० - १२ ऑगस्ट, फ्लोरिडा ( वेळ रात्री ८ वाजल्यापासून)पाचवी ट्वेंटी-२० - १३ ऑगस्ट, फ्लोरिडा ( वेळ रात्री ८ वाजल्यापासून)

सर्व सामने - जिओ सिमेना व फॅन कोडवर 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजहार्दिक पांड्यासूर्यकुमार अशोक यादव
Open in App