India vs West Indies: रविवारी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात एक मजेदार घटना पाहायला मिळाली. या सामन्यात टीम इंडियाच्या क्षेत्ररक्षणादरम्यान दीपक हुड्डा आपला सहकारी खेळाडू प्रसिद्ध कृष्णाची जर्सी घालून मैदानात उतरला. त्याने जर्सीवरील प्रसिद्ध कृष्णाचे नाव टेप लावून लवपले, पण नेटकऱ्यांच्या नजरेतून तो सुटू शकला नाही. त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले असून, लोक त्यावर मजेशीर कमेंट्स करत आहेत.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दीपक हुडाने गोलंदाजी करताना विकेट घेतली आणि फलंदाजी करताना 33 धावाही केल्या. वेस्ट इंडिजच्या डावाच्या नवव्या षटकात विंडिजचा धोकादायक फलंदाज काइल मेयरला दीपक हुडाने माघारी परतवले. यावेळी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करताना दीपक हुडा प्रसिद्ध कृष्णाच्या जर्सीत दिसला.
दीपक हुडाला प्रसिद्ध कृष्णाच्या जर्सीत पाहून चाहत्यांनी ट्विटरवर बीसीसीआयला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका चाहत्यावर कमेंट करत लिहिले, 'बजेट नाही काय?' तर, आणखी एका यूजरने लिहिले की, 'हुड्डाने 24 नंबरची जर्सी का घातली आहे? विशेष म्हणजे, 24 नंबर क्रुणाल पांड्याचा आहे. सामना सुरू झाला तेव्हा दीपक हुडाच्या जर्सीच्या मागे एक टेप लावलेला दिसला. जसजसा सामना पुढे सरकत गेला, तसा तो टेप निघू लागला. टेप निघाल्यानंतर ही जर्सी प्रसिद्ध कृष्णाची असल्याचे आढळून आले.