भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. वेस्ट इंडिजनं विजयासाठी ठेवलेलं 208 धावांचा लक्ष्य टीम इंडियानं 6 विकेट्स व 8 चेंडू राखून पार केलं. लोकेश राहुलच्या अर्धशतकी खेळीनंतर कर्णधार विराट कोहलीनं तुफान फटकेबाजी करताना नाबाद 94 धावा चोपून भारताला विजय मिळवून दिला. या सामन्यात विराटची खेळी अविस्मरणीय ठरलीय, शिवाय त्यानं विजयानंतर केलेलं सेलिब्रेशनही सर्वांच्या चर्चेचा विषय ठरले. विजय मिळवल्यानंतर विराटनं अनोखं सेलिब्रेशन केलं. विराटच्या या सेलिब्रेशननंतर सोशल मीडियावर चांगलाच धुरळा उडाला. सामन्यानंतर भारताच्या विजयापेक्षा विराटच्या सेलिब्रेशनचीच चर्चा रंगली आणि त्यात बीग बी अमिताभ बच्चन यांनीही एट्री घेतली. त्यांनी ट्विट करत प्रतिस्पर्धी संघाला वडीलकीचा सल्ला दिला. कोहलीला त्यांचा हा सल्ला फार आवडला.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India vs West Indies : कितनी बार बोला तेरे को.. की Virat को मत छेड़... 'विराट' खेळीवर बिग बींची 'डायलॉगबाजी'
India vs West Indies : कितनी बार बोला तेरे को.. की Virat को मत छेड़... 'विराट' खेळीवर बिग बींची 'डायलॉगबाजी'
भारताच्या विजयापेक्षा विराटच्या सेलिब्रेशनचीच चर्चा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 12:38 IST
India vs West Indies : कितनी बार बोला तेरे को.. की Virat को मत छेड़... 'विराट' खेळीवर बिग बींची 'डायलॉगबाजी'
ठळक मुद्देभारतानं पहिल्या सामन्यात 6 विकेट्स राखून विजय मिळवलाविराट कोहलीच्या नाबाद 94, तर लोकेश राहुलच्या 62 धावांची महत्त्वपूर्ण खेळीतीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी