Join us
Daily Top 2Weekly Top 5

India vs West Indies, 2nd Test : टीम इंडियाचं मिशन 'क्लीन स्वीप'; जाणून घ्या सामना कधी व कोठे!

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघाने पहिली कसोटी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची दुसरी कसोटी आजपासून किंगस्टन येथे खेळवण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 18:40 IST

Open in App

किंगस्टन, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघाने पहिली कसोटी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची दुसरी कसोटी आजपासून किंगस्टन येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यातही विजय मिळवून आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थान कायम राखण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे.

अजिंक्य रहाणेने झळकावलेले दहावे शतक व हनुमा विहारीच्या 93 धावांनंतर जसप्रीत बुमराहने अवघ्या 7 धावांत घेतलेल्या 5 बळींमुळे पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा 318 धावांनी धुव्वा उडविला. चौथ्या दिवशी विजयासाठी 419 धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान दुसऱ्या डावात 100 धावांवर गारद झाला.   इशांतने 31 धावांत 3 तर, शमीने 13 धावांत 2 बळी घेत बुमराहला चांगली साथ दिली.   आजपासून सुरू होणाऱ्या कसोटीत भारतीय संघात बदल करण्याची कॅप्टन विराट कोहलीची इच्छा अजिबात दिसत नाही. पण, कोहलीनं सातत्यानं संघात बदल करण्याचे सत्र कायम राखले आहे. त्यामुळे या सामन्यात निदान एक तरी बदल होईल अशी अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत संघात आर अश्विनला संधी मिळते की रोहित शर्माला हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.  

  • सामन्याची वेळः रात्री 8 वाजल्यापासून
  • थेट प्रक्षेपणः  Sony Ten 1/HD 

संभाव्य संघ :

  • भारत- विराट कोहली. मयांक अग्रवाल, लोकेश राहुल/रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विराही, रिषभ पंत, रवींद्र जडेजा/आर अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.  
  • वेस्ट इंडिज - जेसन होल्डर, क्रेग ब्रॅथवेट, डॅरेन ब्राव्हो, शॅमर्ह ब्रुक्स, जॉन कॅम्प्बेल, रोस्टन चेस, रॅहकिम कोर्नवॉल, जॅहमर हॅमिल्टन, शेनॉन गॅब्रिएल, शिमरॉन हेटमायर, शे होप, किमो पॉल, केमार रोच. 
टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजभारतवेस्ट इंडिज