India vs West Indies 2nd Test Shubman Gill Escapes Equaling Unwanted Toss Record : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात येईल, अशी चर्चा रंगली होती. पण नाणेफेकीनंतर गिलनं ही चर्चा व्यर्थ ठरवत कोणत्याही बदला शिवाय मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अखेर तो जिंकला!
दिल्लीच्या मैदानातील नाणेफेकीचा नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूनं लागला अन् शुबमन गिल नकोशा विक्रमाची बरोबरी करण्यापासून वाचला. इंग्लंड दौऱ्यातील तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी स्पर्धेतील पाच सामन्यांच्या मालिकेतून शुबमन गिलनं कसोटीत कॅप्टन्सीच्या रुपात नव्या इनिंगला सुरुवात केली. इंग्लंड दौऱ्यात त्याला एकाही कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकता आली नव्हती. त्यानंतर अहमदाबादच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यातही गिल नाणेफेकीच्या वेळी कमनशिबी ठरला. सलग सहाव्यांदा त्याने नाणेफेक गमावली. पण सातव्या कसोटी सामन्यात खास 'लक फॅक्टर' त्याच्या कामी आला अन् नाणेफेकीतील पराभवाच्या 'सिक्सर' नंतर शुबमन गिल अखेर टॉस जिंकला. जर त्याने हा टॉस गमावला असता तर कसोटी संघाचे नेतृत्व करताना पहिल्या सात सामन्यात सलग टॉस गमावण्याचा लाजिरवाणा रेकॉर्ड त्याच्या नावे झाला असता.
रोहित-विराट २०२७ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार का? नकारात्मक चर्चेत शुबमन गिलचं सकारात्मक वक्तव्य
'लक फॅक्टर'! सातव्या सामन्यात टळली गिलच्या मागे लागलेली साडेसाती
शुबमन गिल हा क्रिकेटच्या मैदानात ७७ क्रमांकाची जर्सी घालून मिरवतो. शुबमन गिल याला अंडर १९ पासून ७ क्रमांकाची जर्सी घालायची होती. कारण हा क्रमांक तो स्वत:साठी लकी मानतो. ७ क्रमांकाची जर्सी उपलब्ध नसल्यामुळे त्याने ७७ क्रमांकाची जर्सी घालण्याचा पर्याय निवडला. आता कसोटीतील कॅप्टन्सीच्या रुपात सातवा सामना खेळताना त्याने पहिल्यांदा टॉस जिंकला. ही गोष्ट म्हणजे लक फक्टर खरंच त्याच्या कामी आला हेच दाखवून देणारी आहे.
पहिला टॉस जिंकण्यासाठी सर्वाधिक कसोटी सामने घेणारा कॅप्टन कोण?
न्यूझीलंडचा माजी कर्णधार बेव्हन कॉंग्डन याला कर्णधार म्हणून पहिला टॉस जिंकण्यासाठी तब्बल ८ व्या कसोटी सामन्यापर्यंत प्रतिक्षा करावी लागली होती. शुबमन गिल या यादीत न्यूझीलंडच्या टॉम लॅथमसह संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहे. या दोघांनी पहिल्या सहा सामन्यात नाणेफेक गमावल्यावर सातव्या सामन्यात टॉस जिंकला.
- बेव्हन कॉंग्डन (न्यूझीलंड) – ७ सामने
- टॉम लॅथम (न्यूझीलंड) – ६ सामने
- शुभमन गिल (भारत) – ६ सामने
दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन
यशस्वी जैस्वाल, लोकेश राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
वेस्ट इंडिज संघाची प्लेइंग इलेव्हन
टॅगेनराईन चंद्रपॉल, जॉन कॅम्पबेल, अॅलिक अथानाझ, शाय होप, टेविन इम्लाक (यष्टिरक्षक), रॉस्टन चेस (कर्णधार), जस्टिन ग्रिव्ह्ज, खारी पियरे, जोमेल वॉरिकन, अँडरसन फिलिप, जेडन सिल्स.
टीम इंडियाच्या कसोटी संघाचे नेतृत्व शुबमन गिलकडे सोपवण्यात आले विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतून शुबमन गिलनं आपल्या कसोटी सात हा लकी आकडा असल्याचे मानत ७७ क्रमांकाची जर्सी घालून मिरवणाऱ्या शुबमन गिलनं कसोटी संघाचे नेतृत्व लकी जर्सीसह मिरवणाऱ्या शुबमन गिलला अखेर टॉस वेळी नशीबाची साथ मिळाली आहे.