Join us

India vs West Indies, 2 nd test : वेस्ट इंडिजचा बारावा खेळाडू फलंदाजीला उतरला; वाचा कारण

जमैकाच्या पर्यावरणातील बदल आणि तापमानामुळे खेळाडूवर परिणाम.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 22:22 IST

Open in App

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान दुसरी कसोटी सुरू आहे. जमैकाच्या सबीना पार्क मैदानावर चौथ्या दिवशीच्या खेळावेळी आश्चर्यकारक घटना घडली आहे. वेस्ट इंडिजचे फलंदाज डरेन ब्राव्हो मैदानातून परतला आहे. जमैकाच्या पर्यावरणातील बदल आणि तापमानामुळे ब्राव्होला अस्वस्थ वाटू लागले होते. यामुळे मैदानामध्ये फिजिओ आले आणि त्याला बाहेर घेऊन गेले आहेत. 

डरेन ब्राव्हो याला रिटायर्ड हर्ट घोषित करण्यात आले, मात्र काही वेळातच ब्राव्हो फलंदाजी करण्यासाठी उतरणार नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे त्याचा बदली खेळाडू मैदानावर फलंदाजीला उतरेल, असे अधिकृत सांगण्यात आले. यानंतर वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने ट्वीट करत ब्राव्होच्या जागी जरमेन ब्लॅकवुड फलंदाजी करणार असल्याचे घोषित केले. 

दरम्यान, वेस्ट इंडिजचा चौथा विकेट पडला असून बदली खेळाडू ब्लॅकवूड फलंदाजीसाठी उतरला आहे. ब्राव्होने 41 चेंडूंमध्ये 23 रन बनविले होते. मॅचच्या तिसऱ्या दिवशी इशांत शर्मा याचा वेगवान बाऊन्सर ब्राव्होवर आदळला होता. मात्र, त्याने नंतर फलंदाजी केली. चौथ्या दिवशीही ब्राव्होने फलंदाजीला सुरूवात केली. मात्र, काही ओव्हरनंतर ता मैदानातून बाहेर पडला. मैदानातून जाताना ब्राव्होच्या चेहऱ्यावरील हावभावावरून तब्येत ठीक नसल्याचे वाटत होते. 

टॅग्स :वेस्ट इंडिजभारत