KL Rahul Special Fans Spotted In Delhi : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल याने आपल्या कॅप्टन्सीच्या कारकिर्दीतील पहिल्यांदा टॉस जिंकला आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
केएल राहुलसाठी कायपण... दिल्लीकर चाहत्याची खास फलकबाजी
आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत यशस्वी जैस्वाल आणि लोकेश राहुल जोडीनं संघाला चांगली सुरुवात करून दिल्याचेही पाहायला मिळाले. सामन्या दरम्यान एका दिल्लीकर चाहत्याने केएल राहुलसाठी कायपण... या धाटणीत खास फलकबाजीसह सर्वांचे लक्षवेधून घेतल्याचे पाहायला मिळाले. लोकेश राहुलसाठी दिल्ली सोशल मीडियावर दिल्लीच्या स्टेडियमवर लोकेश राहुलसंदर्भातील क्रेझ दाखवणारा फोटो चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. केएल राहुलच्या बॅटिंगमधील क्लास पाहण्यासाठी आम्ही शाळेला दांडी मारून स्टेडियमवर पोहचलोय, अशा आशयाचा फलक दाखवत चाहत्याने भारतीय बॅटरची खेळी पाहण्यासाठी उत्सुकता दाखवली.
IND vs WI ...अन् 'लक फॅक्टर' गिलच्या कामी आला; पराभवाचा 'सिक्सर' पदरी पडल्यावर अखेर तो जिंकला!
केएल राहुलनं क्लास दाखवला; पण शेवटी नको ते घडलं
लोकेश राहुलनं चांगली सुरुवात करत चाहत्यांच्या डोळ्याचे पारणे फेडण्याची आणखी एक खेळी करायला सज्ज असल्याचे संकेत दिले. पण शाळेला दांडी मारून आलेल्या चाहत्यांच्या पदरी पहिल्या दिवसाच्या खेळात लंच आधीच निराशा पदरी पडली. कारण चांगली सुरुवात मिळाल्यावर KL राहुल यष्टिचित होऊन तंबूत परतला.
शतकी खेळीत जे साध्य झालं नाही ते या डावात साधलं, पण..
लोकेश राहुलनं यशस्वीच्या साथीनं पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. त्याच्या भात्यातून ५ चौकारांसह एक उत्तुंग षटकारही पाहायला मिळाला. याआधीच्या खेळीत शतकी खेळीतही त्याने षटकार मारला नव्हता. त्यामुळे तो यावेळी एका वेगळ्या मडूमध्ये असल्याची झलक दिसली. पण भारतीय संघाच्या धावफलकावर ५८ धावा असताना वॉरिकनच्या गोलंदाजीवर तो पुढे येऊन फटका मारण्याच्या नादात फसला. कॅरेबियन विकेट किपरनं कोणतीही चूक न करता मिळालेल्या संधीच सोनं करत तो क्रीजमध्ये पोहचण्याआधी दांड्या उडवल्या अन् शाळेला दांडी मारून स्टेडियमवर पोहचलेल्या चाहत्यांच्या पदरी निराशा आली. लोकेश राहलनं पहिल्या डावात ५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५४ चेंडूत ३८ धावांची खेळी केली.
पहिल्या कसोटीतील शतक ठरलं खास, यावेळी मात्र अर्धशतकाच्या आधीच माघारी फिरण्याची वेळ
रोहित शर्माच्या कसोटीतील निवृत्तीनंतर इंग्लंड दौऱ्यापासून लोकेश राहुल भारतीय संघाच्या डावाची सुरुवात करताना दिसत आहे. इग्लंडच मैदान गाजवल्यावर घरच्या मैदानातील वेस्ट इंडिज विरुद्धच्या अहमदाबादच्या मैदानातील पहिल्या कसोटी सामन्यात त्याच्या भात्यातून खास शतक आल्याचे पाहायला मिळाले. नऊ वर्षांनी त्याने घरच्या मैदानात कसोटी कारकिर्दीतील दुसरे शतक साजरे केले होते. दिल्लीच्या मैदानातही त्याचा हाच क्लास पाहायला मिळेल, अशी अपेक्षा होती. पण पहिल्या डावात चांगली सुरुवात मिळाल्यावर अर्धशतकाशिवाय तंबूत परतला.