Join us

India vs West Indies, 2nd ODI : जसप्रीत बुमराह मैदानावर परतला; विराट, रोहितसह कसून सराव केला

दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेला एक आठवडा शिल्लक असताना बुमराहनं पाठिच्या खालच्या भागातील हाडाला फ्रॅक्चर झाल्यामुळे माघार घेतली होती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 13:43 IST

Open in App

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यात पाहुण्यांनी बाजी मारली. शिमरोन हेटमायर आणि शे होप यांच्या शतकी खेळीनं भारतीय गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. भारताचे 288 धावांचे लक्ष्य विंडीजनं 8 विकेट राखून सहज पार केले. तीन सामन्यांच्या मालिकेत विंडीजनं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसरा सामना उद्या विशाखापट्टणम येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्याच्या एक दिवस आधी टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह मैदानावर उतरलेला दिसला. पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या होत्या. त्यामुळे बुमराहच्या येण्यानं संघांच मनोबल उंचावण्यात नक्की मदत मिळेल. पण...

दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी मालिकेला एक आठवडा शिल्लक असताना बुमराहनं पाठिच्या खालच्या भागातील हाडाला फ्रॅक्चर झाल्यामुळे माघार घेतली होती. त्यानंतर तो उपचारासाठी लंडनमध्ये गेला होता, पण त्याच्यावर शस्त्रक्रीया करावी लागणार नसल्याचा दिलासा चाहत्यांना मिळाला होता. त्यानंतर मायदेशात परतलेला बुमराह तंदुरुस्तीसाठी कसून सराव करत आहे. बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून कमबॅक करेल, अशी आशा व्यक्त केली जात होती. ही मालिका जानेवारीत होणार आहे. पण, निवड समिती प्रुमख एमएसके प्रसाद यांच्या माहितीनुसार बुमराहचं पुनरागमन लांबणीवर पडले आहे. 

तंदुरूस्तीसाठी कसून मेहनत घेणारा बुमराह वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात मैदानावर दिसला. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा सामना 18 डिसेंबरला विशाखापट्टणम येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वी बुमराहनं टीम इंडियाच्या सराव सत्रात सहभाग घेतला. त्यानं कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना नेट्समध्ये गोलंदाजी केली. यावरून तो किती तंदुरुस्त झाला आहे, याची चाचपणी करण्यात येणार आहे. त्यामुळे बुमराहच्या मैदानावर उतरण्यानं तो दुसऱ्या वन डेत खेळणार असा तर्क लावू नका.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजजसप्रित बुमराहभारतीय क्रिकेट संघ