India vs West Indies, 2 nd test : जे धोनी, गांगुली यांना जमले नाही ते कोहलीने करून दाखवले...

भारताचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सौरव गांगुली यांनाही ही गोष्ट जमल्याचे पाहायला मिळाले नव्हते, पण कोहलीने ते करून दाखवले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 13:40 IST2019-09-03T13:38:51+5:302019-09-03T13:40:25+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India vs West Indies, 2 nd test: Virat Kohli showed that MS Dhoni, Saurav Ganguly did not get ... | India vs West Indies, 2 nd test : जे धोनी, गांगुली यांना जमले नाही ते कोहलीने करून दाखवले...

India vs West Indies, 2 nd test : जे धोनी, गांगुली यांना जमले नाही ते कोहलीने करून दाखवले...

किंगस्टन, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजच्या धर्तीवर इतिहास रचला आहे. कारण अशी कामगिरी करणारा तो भारताचा सर्वोत्तम कर्णधार ठरला आहे. कारण कोहलीसारखी कामगिरी भारताच्या एकाही कर्णधाराला करणे जमलेले नाही. भारताचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि सौरव गांगुली यांनाही ही गोष्ट जमल्याचे पाहायला मिळाले नव्हते, पण कोहलीने ते करून दाखवले आहे.

कोहलीनं परदेशात सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या भारतीय कर्णधारांत गांगुलीला ( 11 विजय)  मागे टाकले आहे. कोहलीनं 27 सामन्यांत 13 विजय मिळवले आहेत. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने परदेशात सहा कसोटी सामने जिंकण्याचा पराक्रम केला होता. शिवाय भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी विजय आता कोहलीच्या नावावर आहेत. कोहलीच्या नावावर आता 28 कसोटी विजय आहेत आणि कोहलीने धोनीला (27 विजय) पिछाडीवर सोडले आहे. कोहलीनं 48 कसोटीत हा पराक्रम केला आणि धोनीपेक्षा 12 सामने कमी खेळून त्याने ही मजल मारली आहे. 

भारताने 'कसोटी' मालिका जिंकली, वेस्ट इंडिजवर 257 धावांनी विजय
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने सहजच विजय मिळवला. भारताने दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा संघ 210 धावांवर संपुष्टात आणला. त्यामुळे, 257 धावांनी विजय मिळवत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 2-0 ने कसोटी मालिका जिंकली. जमैकाच्या सबीना पार्क मैदानावर चौथ्या दिवशीच्या खेळावेळी आश्चर्यकारक घटना घडली आहे. वेस्ट इंडिजचे फलंदाज डरेन ब्राव्हो मैदानातून परतला होता. जमैकाच्या पर्यावरणातील बदल आणि तापमानामुळे ब्राव्होला अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे मैदानामध्ये फिजिओ आले आणि त्याला बाहेर घेऊन गेले होते. 

हनुमा विहारीच्या कारकीर्दीतील पहिल्या शतकी खेळीनंतर जसप्रीत बुमराहच्या हॅट्ट्रिकच्या जोरावर भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपदमध्ये दुसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडीजचा पहिला डाव 47.1 षटकात 117 धावांत गुंडाळला. त्यामुळे भारताने तब्बल 299 धावांची भलीमोठी आघाडी घेत सामन्यावर घट्ट पकड मिळवली. त्यानंतर, फलंदाजीस आलेल्या टीम इंडियाने 168 धावांवर 4 गडी बाद असताना डाव घोषित केला. त्यामुळे वेस्ट इंडिजला 467 धावांचे लक्ष्य पार देण्यात आले होते. 

Web Title: India vs West Indies, 2 nd test: Virat Kohli showed that MS Dhoni, Saurav Ganguly did not get ...