Join us

India vs West Indies, 2 nd test : जे गेल्या ५० वर्षांत गोलंदाजांना जमले नाही ते आज घडले...

आतापर्यंत क्रिकेट जगताने बरेच महान गोलंदाज पाहिले. पण जे या महान गोलंदाजांना आतापर्यंत जमले नाही ते आज घडल्याचे पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2019 19:14 IST

Open in App

किंगस्टन, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : आतापर्यंत क्रिकेट विश्वात जे एकाही गोलंदाजाला घडले नाही ते आज घडल्याचे पाहायला मिळाले आहे. आतापर्यंत क्रिकेट जगताने बरेच महान गोलंदाज पाहिले. पण जे या महान गोलंदाजांना आतापर्यंत जमले नाही ते आज घडल्याचे पाहायला मिळाले.

वेस्ट इंडिजचे महान फलंदाज आणि समालोचक सर विव रीचर्ड्स हे गोलंदाजांचे कर्दनकाळ समजले जायचे. सर विव रीचर्ड्स हे मैदानात जेव्हा उतरायचे तेव्हा गोलंदाजांना धडकी भरायची. आता सर विव रीचर्ड्स कधी आऊट होणार, हे टेंशन त्याच्या चेहऱ्यावर दिसायचे. पण जे या गोलंदाजांना करता आले नाही ते आज घडले आहे. सर विव रीचर्ड्स यांनीच ही गोष्ट सांगितली आहे.

 भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याला शुक्रवारी सबिना पार्क येथे सुरुवात झाली. पण हा सामना सुरु होण्यापूर्वीच वेस्ट इंडिजचे महान फलंदाज आणि समालोचक सर विव रीचर्ड्स कोसळले. त्यानंतर लगेचच त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सर रीचर्ड्स यांना समालोचन करताना भोवळ आली होती.

सामना सुरु होण्यापूर्वी सर रीचर्ड्स हे समालोचन करण्यासाठी मैदानात उभे होते. यावेळी त्याची प्रकृती ढासळली आणि त्यांना त्यांना स्वयंसेवकांच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 

यानंतर सर रीचर्ड्स यांनी सांगितले की, " क्रिकेट विश्वातील चाहत्यांना मी सांगू इच्छितो की, मी पूर्णपणे फिट आहे. मी सध्या पूर्णपणे बरा झालो असून आता समालोचन करत आहे. आतापर्यंत एकाही गोलंदाजाला जे जमले नाही ते नैसर्गीकरीत्या घडले." सर रीचर्ड्स हे कधीही वेगवान गोलंदाजाच्या बाऊन्सरचा शिकार झाले नव्हते. त्यामुळे त्यांनी असे वक्तव्य केल्याचे म्हटले जात आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजभारतवेस्ट इंडिज