India vs West Indies 1st Test KL Rahul Scores His 11th Test Century : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाच्या खेळात लोकेश राहुलनं शतक साजरे केले. कसोटी कारकिर्दीतील ११ शतक झळकावल्यावर सलामीवीर लोकेश राहुलनं हटके स्टाईलमध्ये शतकी आनंद व्यक्त केला. त्याचे हे सेलिब्रेशन लक्षवेधी ठरले.
९ वर्षांची प्रतिक्षा संपली, शतक साजरे करताच KL राहुलनं शिट्टी मारून व्यक्त केला आनंद
क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये मोठी खेळी केल्यावर लोकेश राहुल कानावर हात धरून ('shut the outside noise') सेलिब्रेशन करताना पाहायला मिळाले आहे. पण यावेळी त्याने शिट्टी मारुन शतक साजरे केले. कारण घरच्या मैदानात ९ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर त्याच्या भात्यातून हे शतक आले आहे. याआधी २०१६ मध्ये लोकेश राहुलनं भारतीय मैदानात कसोटी शतक झळकावले होते.
घरच्या मैदानातील फक्त दुसरे शतक; त्यामुळेच KL राहुलसाठी हा क्षण ठरला खास
आतापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीत लोकेश राहुलनं ११ पैकी फक्त दोन शतके ही भारतीय मैदानात झळकावली आहेत. २०१६ मध्ये चेन्नईच्या मैदानात त्याने १९९ धावांची खेळी केली होती. हे त्याचे मायदेशातील पहिले शतक होते. ही त्याची कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या देखील आहे. ३२११ दिवसांनी लोकेश राहुलनं घरच्या मैदानात दुसऱ्या शतकाचा डाव साधला. तो घरच्या मैदानातील दोन शतकांमध्ये खूप मोठे अंतर असणारा फलंदाजही ठरला आहे.
केएल राहुलनं कसोटी कारकिर्दीत कधी अन् कुणाविरुद्ध शतक झळकावले?
क्रमांक | धावा | प्रतिस्पर्धी संघ | मैदान | वर्ष |
---|---|---|---|---|
1 | 110 | ऑस्ट्रेलिया | सिडनी | 2015 |
2 | 108 | श्रीलंका | कोलंबो | 2015 |
3 | 158 | वेस्ट इंडिज | किंग्स्टन | 2016 |
4 | 199 | इंग्लंड | चेन्नई | 2016 |
5 | 149 | इंग्लंड | द ओव्हल | 2018 |
6 | 129 | इंग्लंड | लॉर्ड्स | 2021 |
7 | 123 | दक्षिण आफ्रिका | सेंचुरियन | 2021 |
8 | 101 | दक्षिण आफ्रिका | जोहान्सबर्ग | 2022 |
9 | 137 | इंग्लंड | लीसेस्टर | 2025 |
10 | 100 | इंग्लंड | लॉर्ड्स | 2025 |
11 | 100* | वेस्ट इंडिज | अहमदाबाद | 2025 |
Web Summary : KL Rahul scored his 11th Test century in Ahmedabad, celebrating with a whistle. This home-ground century comes after a nine-year wait; his last Indian century was in 2016.
Web Summary : अहमदाबाद में केएल राहुल ने अपना 11वां टेस्ट शतक बनाया और सीटी बजाकर जश्न मनाया। यह घरेलू मैदान पर नौ साल बाद आया शतक है; पिछला भारतीय शतक 2016 में आया था।