India vs West Indies 1st Test Day 1 Mohammed Siraj Take 3 Wickets In Opening Spell : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार रॉस्टन चेस याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
DSP सिराजसमोर स्टार दिग्गजाच्या पोराच्या पदरी पडला 'भोपळा'
DSP सिराजनं पहिल्याच स्पेलमध्ये सलामीवीर टॅगेनरीन चंद्रपॉल (Tagenarine Chanderpaul) याची विकेट घेत संघाला पहिले यश मिळवून दिले. कॅरेबियन ताफ्यातील दिग्गज स्टार क्रिकेटर शिवनारायण चंदरपॉलचा मुलगा कमबॅकच्या सामन्यात ११ चेंडूचा सामना करून शून्यावर माघारी परतला. मोहम्मद सिराजनं सलामीवीराशिवाय आपल्या पहिल्या स्पेलमध्ये ब्रँडन किंग (Brandon King) आणि अलिक अथनाझे (Alick Athanaze) यांची विकेट घेतली. ते अनुक्रमे १३ (१५) आणि १२ (२४) धावा करून तंबूत परतले.
ICC T20I Rankings : फुसका बार ठरेलेल्या पाक खेळाडूमुळं पांड्याला फटका; जाणून घ्या सविस्तर
शंभरीच्या आत अर्धा संघ तंबूत!
मोहम्मद सिराजशिवाय जसप्रीत बुमराहनं जॉन कॅम्पबेल याच्या रुपात आपल्या पहिल्या स्पेलमध्ये एक विकेट घेतली. त्याने संघाच्या धावसंख्येत अवघ्या ८ धावांची भर घातली. याशिवाय कुलदीप यादवनं आपल्या फिरकीतील जादू दाखवताना वेस्ट इंडिजच्या होपला आपल्या जाळ्यात अडकवले. शाई होप ३६ चेंडूत २६ धावांची खेळी केली. भारतीय संघाच्या गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजच्या संघातील आघाडीच्या फळतील एकाही फलंदाजाचा निभाव लागला नाही. परिणामी उपहारापर्यंत अर्धा संघ अवघ्या ९० धावांवर तंबूत परतला होता.
कसोटी कारकिर्दीतील पाचव्या डावात द्विशतक, मग फ्लॉप शोचा सिलसिला
टीम इंडियाविरुद्धच्या आव्हानात्मक दौऱ्यासाठी कॅरेबियन संघात मोठे बदल करण्यात आले आहे. शिवनारायण चंद्रपॉलचा मुलगा टॅगेनरीन चंद्रपॉल याच्यासाठी हा दौरा खास आहे. कारण त्याला कसोटी संघात पुन्हा एकदा कमबॅकची संधी देण्यात आलीये. १० सामन्यात १ शतक आणि १ अर्धशतक झळकवणाऱ्या या पठ्ठ्यानं कसोटीत २०७ धावांची सर्वोच्च खेळी केल्याचा रेकॉर्ड आहे. ३० नोव्हेंबर २०२२ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यातून पदार्पण करणाऱ्या या पठ्ठ्यानं पाचव्या डावात कसोटी कारकिर्दीत द्विशतकी डाव साधला होता. इंग्लंड विरुद्ध त्याने नाबाद २०७ धावांची खेळी केली. पण त्यानंतर १४ डावात मिळून त्याला ४० धावसंख्येचा आकडा पार करता आलेला नाही. त्यात आता आणखी एका डावाची भर पडलीये.