India Tour of Sri Lanka in 2024: ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताचा युवा संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर २७ जुलैपासून टीम इंडियाचा श्रीलंका दौराही नियोजित आहे आणि त्याचे वेळापत्रक आज जाहीर झाले. भारतीय संघ या दौऱ्यावर ३ ट्वेंटी-२० व ३ वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी BCCI ने शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंची निवड केली आहे आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना विश्रांती दिली आहे.
India vs Zimbabwe
पहिली ट्वेंटी-२० - ६ जुलै, हरारे
दुसरी ट्वेंटी-२० - ७ जुलै, हरारे
तिसरी ट्वेंटी-२० - १० जुलै, हरारे
चौथी ट्वेंटी-२० - १३ जुलै, हरारे
पाचवी ट्वेंटी-२०- १४ जुलै, हरारे
१४ जुलैला झिम्बाब्वे दौऱ्यावरील शेवटचा व पाचवा ट्वेंटी-२० सामना खेळला जाईल आणि तोच संघ कदाचित श्रीलंका दौऱ्यावरील ट्वेंटी-२० मालिकेत खेळेल. पण, आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा लक्षात घेता वन डे मालिकेत सीनियर खेळाडूंना खेळावे लागेल. त्यामुळे रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर हे वन डे मालिकेत दिसतील. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर २७ जूलै, २८ जुलै व ३० जुलै रोजी ट्वेंटी-२० सामने खेळतील. त्यानंतर २ ऑगस्टपासून वन डे मालिकेला सुरुवात होईल आणि त्यातील दुसरा व तिसरा वन डे सामना अनुक्रमे ४ व ७ ऑगस्टला खेळवला जाईल.
India vs Bangladesh
पहिली कसोटी - १९ ते २३ सप्टेंबर - चेन्नई
दुसरी कसोटी - २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर- कानपूर
पहिली ट्वेंटी-२० - ६ ऑक्टोबर, धर्मशाला
दुसरी ट्वेंटी-२० - ९ ऑक्टोबर, दिल्ली
तिसरी ट्वेंटी-२० - १२ ऑक्टोबर, हैदराबाद
India vs New Zealand
पहिली कसोटी - १६ ते २० ऑक्टोबर, बंगळुरु
दुसरी कसोटी - २४ ते २८ ऑक्टोबर, पुणे
तिसरी कसोटी - १ ते ५ नोव्हेंबर, मुंबई
India vs Australia
पहिली कसोटी - २२ ते २६ नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी - ६ ते १० डिसेंबर, एडिलेड
तिसरी कसोटी- १४ ते १८ डिसेंबर, ब्रिस्बन
चौथी कसोटी - २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी - ३ ते ७ जानेवारी २०२५, सिडनी
India vs England
पहिली ट्वेंटी-२० - २२ जानेवारी, चेन्नई
दुसरी ट्वेंटी-२० - २५ जानेवारी, कोलकाता
तिसरी ट्वेंटी-२० - २८ जानेवारी, राजकोट
चौथी ट्वेंटी-२० - ३१ जानेवारी, पुणे
पाचवी ट्वेंटी-२० - २ फेब्रुवारी, मुंबई
पहिली वन डे - ६ फेब्रुवारी, नागपूर
दुसरी वन डे - ९ फेब्रुवारी, कटक
तिसरी वन डे - १२ फेब्रुवारी, अहमदाबाद
सुरुवात होणे अपेक्षित१९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ला
०२५ इंडियन प्रीमिअर लीग २
जून मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल