Join us
Daily Top 2Weekly Top 5

U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!

भारत-श्रीलंका यांच्यात रंगणार सेमीफायनलची पहिली लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 22:28 IST

Open in App

U19 Asia Cup 2025 :  १९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेतील सेमीफायनलचे चार संघ पक्के झाले आहेत. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने 'अ' गटातील सर्वच्या सर्व सामने जिंकत दिमाखात सेमीफायनल गाठली होती. याच गटातून टीम इंडियापाठोपाठ पाकिस्तानचा संघानेही सेमीत धडक मारली आहे. 'ब' गटातून श्रीलंका आणि बांगलादेश या संघांनी फायनलच्या दिशेनं एक पाउल पुढे टाकले आहे. इथं एक नजर टाकुयात सेमीत कोणता संघ कधी अन् कुणाविरुद्ध भिडणार त्यासंदर्भातील सविस्तर...

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!भारत-श्रीलंका यांच्यात रंगणार सेमीफायनलची पहिली लढत

अंडर १९ आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाने  'अ' गटात साखळी फेरीत सर्व तीन सामन्यातील विजयासह टॉपला राहिला. त्यामुळे भारतीय संघ 'ब' गटातील दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या श्रीलंकेविरुद्ध सेमीफायनल खेळताना दिसेल. श्रीलंकेच्या संघाने ३ पैकी २ सामने जिंकून सेमीत धडक मारली आहे. शुक्रवारी १९ फेब्रुवारीला दुबईतील आयसीसी अकादमीच्या मैदानात हे दोन संघ मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, सकाळी १० वाजून ३० मिनिटांनी हा सामना सुरु होईल.

आधी गंभीरसोबत ओपनिंग; आता IPL लिलावात 'त्या' खासदाराच्या लेकावर शाहरुखच्या KKR नं लावला पैसा!

पााकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात दुसरी सेमीफायनल

१९ डिसेंबरलाच दुबईतील द सेव्हन्स स्टेडियमवर पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात दुसरा सेमीफायनल सामना रंगल्याचे पाहायला मिळेल. बांगलादेशच्या संघाने आपल्या 'ब' गटातून ३ पैकी ३ सामने जिंकले आहेत. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचा संघ ३ पैकी २ सामने जिंकले आहेत.

...तर भारत-पाक यांच्यात पुन्हा रंगणार फायनल

अंडर १९ आशिया कप स्पर्धेतील फायनल लढत  रविवारी २१ डिसेंबरला नियोजित आहे. सेमीफायलमधील विजेते संघ जेतेपदासाठी एकमेकांविरुद्ध भिडतील. भारतीय संघ कमालीची कामगिरी करत असून पहिल्या सेमीफायलमध्ये ते श्रीलंकेला मात देऊन फायनल गाठतील अशी आस आहे. दुसऱ्या बाजूला जर पाकिस्तानच्या संघाने बांगलादेशला नमवले तर आशिया कपसाठी पुन्हा एकदा भारत पाक यांच्यात सामना रंगल्याचे पाहायला मिळू शकते.  

English
हिंदी सारांश
Web Title : U19 Asia Cup: India-Pakistan Final Showdown Looms!

Web Summary : U19 Asia Cup's semi-final lineup is set. India faces Sri Lanka, while Pakistan clashes with Bangladesh. A victory for both India and Pakistan in their respective semi-finals would set the stage for a thrilling India-Pakistan final.
टॅग्स :एशिया कपभारत विरुद्ध पाकिस्तानभारत विरुद्ध श्रीलंका