Join us  

India vs Sri Lanka: टीम इंडियाची पाकिस्तानच्या विक्रमाशी बरोबरी; पण, 'विराट'सेना लै भारी!

भारतानं या विजयासह तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात घातली आणि 2020 वर्षाची दणक्यात सुरुवात केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 1:06 PM

Open in App

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियानं विजय मिळवला. भारतानं या विजयासह तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात घातली आणि 2020 वर्षाची दणक्यात सुरुवात केली. भारताच्या फलंदाजानंतर जलदगती गोलंदाजांच्या भेदक माऱ्यानं लंकेला हादरे दिले. जसप्रीत बुमराह ( 1/5) , शार्दूल ठाकूर ( 2/19), वॉशिंग्टन सुंदर ( 2/37) आणि नवदीप सैनी ( 3/28) यांनी टीम इंडियाला मोठा विजय मिळवून दिला. या विजयासह टीम इंडियानं पाकिस्तानच्या विक्रमाशी बरोबरी केली, परंतु त्यातही 'विराट'सेना लै भारी ठरली.

टीम इंडियानं मालिका जिंकली, 2020ची दणक्यात सुरुवात केली

नाणेफेक जिंकून श्रीलंकेनं यजमानांना प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. शिखर धवन ( 52) आणि लोकेश राहुल ( 54)  यांनी पहिल्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी करताना संघाला दमदार सुरुवात करुन दिली.  पण, आघाडीवर खेळण्याची संधी मिळालेल्या संजू सॅमसन, श्रेयस अय्यर यांनी निराश केले. कर्णधार विराट कोहलीनं ( 26) सहाव्या क्रमांकावर येताना संघाचा डाव सावरला. त्याला मनीष पांडेची ( 31*) चांगली साथ मिळली आणि टीम इंडियानं मोठी धावसंख्या उभारली. भारतानं अखेरच्या 4 षटकांत 59 धावा चोपून काढल्या. शार्दूल ठाकूरनं 8 चेंडूंत नाबाद 22 धावा करून संघाला दोनशे धावांचा पल्ला पार करून दिला. भारतानं 20 षटकांत 6 बाद 201 धावा केल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचे आघाडीचे चार फलंदाज 26 धावांत माघारी परतले होते. अँजेलो मॅथ्यूज ( 31) आणि धनंजया डी सिल्वा ( 57) या खेळाडूंनी पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना श्रीलंकेच्या आशा जीवंत राखल्या होत्या. पण, लंकेचा संपूर्ण संघ 123 धावांत माघारी परतला आणि टीम इंडियानं 78 धावांनी हा सामना जिंकला. भारताची ही तीन ट्वेंटी-20 सामन्यांची 15वी मालिका आहे. त्यापैकी टीम इंडियानं 13 मालिका जिंकल्या आहेत, तर एक मालिका गमवली आणि एक अनिर्णीत राहिली. ट्वेंटी-20 क्रिकेटमधील भारताचा हा धावांच्या बाबतीत पाचवा सर्वात मोठा विजय ठरला.

या विजयासह टीम इंडियानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या विक्रमाशी बरोबरी केली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक 13 विजयाचा विक्रम टीम इंडियानं शुक्रवारी केला. पाकिस्तान संघानेही श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्याविरुद्ध प्रत्येकी 13 आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामने जिंकले आहेत. पण, टीम इंडियानं 19पैकी 13 सामने जिंकून लै भारी कामगिरी केली आहे. पाकिस्तानला 21 सामन्यांत हा विक्रम करता आला होता. 

जसप्रीत बुमराहचा दे धक्का; आर अश्विन, चहल यांचा मोडला विक्रम

India vs Sri Lanka, 3rd T20I : विराटच्या नावावर लाखमोलाचा विक्रम, ठरला जगातला पहिला फलंदाज

विराट कोहलीचा World Record; पहिली धाव अन् कर्णधारांमध्ये पटकावलं मानाचं स्थान

India vs Sri Lanka, 3rd T20I : अंतिम सामन्यात टीम इंडियानं संघात केले तीन महत्त्वपूर्ण बदल 

India vs Sri Lanka, 3rd T20I : पुण्याचा इतिहास जाणून श्रीलंकेनं संधी साधली अन्...

India vs Sri Lanka, 3rd T20I : अखेर 1637 दिवसांनी 'हा' खेळाडू टीम इंडियाकडून खेळणार 

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाभारतीय क्रिकेट संघविराट कोहलीपाकिस्तानशिखर धवनजसप्रित बुमराहलोकेश राहुलशार्दुल ठाकूर