India vs Sri Lanka, 3rd T20I : टीम इंडियानं मालिका जिंकली, 2020ची दणक्यात सुरुवात केली

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियानं विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 10:11 PM2020-01-10T22:11:56+5:302020-01-10T22:19:25+5:30

whatsapp join usJoin us
India vs Sri Lanka, 3rd T20I : Team India beat Sri Lanka by 78 runs and seal the series 2-0 | India vs Sri Lanka, 3rd T20I : टीम इंडियानं मालिका जिंकली, 2020ची दणक्यात सुरुवात केली

India vs Sri Lanka, 3rd T20I : टीम इंडियानं मालिका जिंकली, 2020ची दणक्यात सुरुवात केली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियानं विजय मिळवला. भारतानं या विजयासह तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी खिशात घातली आणि 2020 वर्षाची दणक्यात सुरुवात केली. भारताच्या फलंदाजानंतर जलदगती गोलंदाजांच्या भेदक माऱ्यानं लंकेला हादरे दिले. जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर आणि नवदीप सैनी यांनी टीम इंडियाला मोठा विजय मिळवून दिला. 

नाणेफेक जिंकून श्रीलंकेनं यजमानांना प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. शिखर धवन ( 52) आणि लोकेश राहुल ( 54)  यांनी पहिल्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी करताना संघाला दमदार सुरुवात करुन दिली. धवन आणि राहुल यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावले. पण, आघाडीवर खेळण्याची संधी मिळालेल्या संजू सॅमसन, श्रेयस अय्यर यांनी निराश केले. कर्णधार विराट कोहलीनं ( 26) सहाव्या क्रमांकावर येताना संघाचा डाव सावरला. त्याला मनीष पांडेची ( 31*) चांगली साथ मिळली आणि टीम इंडियानं मोठी धावसंख्या उभारली. भारतानं अखेरच्या 4 षटकांत 59 धावा चोपून काढल्या. शार्दूल ठाकूरनं 8 चेंडूंत नाबाद 22 धावा करून संघाला दोनशे धावांचा पल्ला पार करून दिला. भारतानं 20 षटकांत 6 बाद 201 धावा करून लंकेसमोर विजयासाठी 202 धावांचे लक्ष्य ठेवले. 


लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेला पहिल्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर जसप्रीत बुमराहनं धक्का दिला. बुमराहनं लंकेच्या दानुष्का गुणथिलकाला (1) वॉशिंग्टन सुंदरकरवी झेलबाद केले. त्यानंतर शार्दूल ठाकूरनं दुसऱ्या षटकात अविष्का फर्नांडोला बाद केले. ओशादा फर्नांडो धावबाद झाला, तर नवदीप सैनीनं अप्रतिम यॉर्कर टाकून कुसर परेराचा त्रिफळा उडवला. श्रीलंकेचे चार फलंदाज 26 धावांत माघारी परतले होते. पॉवर प्लेमध्ये लंकेला 35 धावा करता आल्या. अँजेलो मॅथ्यूजनं 9व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर 19 धावा चोपून लंकेवरील दडपण कमी करण्याचा प्रयत्न केला.

मॅथ्यूज आणि धनंजया डी सिल्वा या अनुभवी खेळाडूनं पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना श्रीलंकेच्या आशा जीवंत राखल्या होत्या. 12व्या षटकात वॉशिंग्टन सुंदरनं ही जोडी तोडली. त्यानं मॅथ्यूजला बाद केले. मॅथ्यूज 31 धावा करून माघारी परतला. शार्दूलनं गोलंदाजीतही कमाल केली. त्यानं दानूश शनाकाला बाद करून श्रीलंकेला सहावा धक्का दिला. त्याच षटकात युजवेंद्र चहलनं अप्रतिम थ्रो करताना वनिंदू हसरंगाला धावबाद करून तंबूत पाठवले. धनंजयानं 31 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. ट्वेंटी-20तील त्याचे हे दुसरे अर्धशतक ठरले. सैनीनं धनंजयाला बाद केले. धनंजया 57 धावांवर माघारी परतला. लंकेचा संपूर्ण संघ 123 धावांत माघारी परतला. 

जसप्रीत बुमराहचा दे धक्का; आर अश्विन, चहल यांचा मोडला विक्रम

India vs Sri Lanka, 3rd T20I : विराटच्या नावावर लाखमोलाचा विक्रम, ठरला जगातला पहिला फलंदाज

विराट कोहलीचा World Record; पहिली धाव अन् कर्णधारांमध्ये पटकावलं मानाचं स्थान

India vs Sri Lanka, 3rd T20I : अंतिम सामन्यात टीम इंडियानं संघात केले तीन महत्त्वपूर्ण बदल 

India vs Sri Lanka, 3rd T20I : पुण्याचा इतिहास जाणून श्रीलंकेनं संधी साधली अन्...

India vs Sri Lanka, 3rd T20I : अखेर 1637 दिवसांनी 'हा' खेळाडू टीम इंडियाकडून खेळणार 

Web Title: India vs Sri Lanka, 3rd T20I : Team India beat Sri Lanka by 78 runs and seal the series 2-0

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.