Join us

India Vs Sri Lanka, Latest News : ... अन् 'हा' फलंदाज मैदानात मरता मरता वाचला, पाहा व्हिडीओ

आज सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात एक अशीच घटना घडल्याचे पाहायला मिळाले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 20:15 IST

Open in App

लीड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. पण क्रिकेटच्या मैदानात काही खेळाडूंना जीवही गमवावा लागला आहे. आज सुरु असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात एक अशीच घटना घडल्याचे पाहायला मिळाले. पण फक्त दैव बलवत्तर म्हणून फलंदाजाचा जीव वाचल्याचे पाहायला मिळाले.

दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर क्विंटन डी'कॉक आणि ऐडन मार्करम हे सलामीवीर मैदानात उतरले. त्यावेळी ही घटना घडल्याचे पाहायला मिळाले. डी'कॉकने यावेळी एक जोरदार फटका लगवला. तो नॉन स्ट्रायकर असलेल्या मार्करमच्या अंगावर आला. मार्करमने प्रसंगवधान दाखवल्यामुळे तो वाचला.

हा पाहा व्हिडीओ

 

भारतीय संघाची सुरक्षा धोक्यात, सामना सुरु असताना गेले धोकादायक विमानभारतीय संघ सध्याच्या विश्वचषकात भन्नाट फॉर्मात आहे. कारण भारतीय संघ या विश्वचषकात पहिल्या क्रमांकावरही पोहोचू शकतो. आज भारत आणि श्रीलंकेचा सामना सुरु आहे. हा सामाना सुरु असताना एक अशी गोष्ट घडली की, त्यामुळे भारतीय संघाची सुरक्षा धोक्यात असल्याचे म्हटले जात आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना सुरु असताना एक विमान मैदानावरून गेले. या विमानावर ' जस्टीस फॉर काश्मीर' असे लिहिण्यात आले होते. या सामन्यात दुसऱ्यांगा एक हेलिकॉप्टर गेले आणि त्यावर 'इंडिया स्टॉप गेनोसाईड अँड फ्री कश्मीर' म्हणजेच ' भारताने काश्मीरमधील नरसंहार थांबवावा आणि ते मुक्त करावे' अशा आशयाचा संदेश लिहिण्यात आला होता.

हे नेमके घडले तरी कधीश्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचे चौथे षटक जसप्रीत बुमरा टाकत होता. त्यामुळे मैगानावरून पहिल्यांदा एक विमान गेले त्यावर ' जस्टीस फॉर काश्मीर' असे लिहिण्यात आले होते. त्यानंतर सामन्याच्या १७व्या षटकातहीअशीच एक घटना घडली. यावेळी एक हेलिकॉप्टर गेले आणि त्यावर 'इंडिया स्टॉप गेनोसाईड अँड फ्री कश्मीर' म्हणजेच ' भारताने काश्मीरमधील नरसंहार थांबवावा आणि ते मुक्त करावे' अशा आशयाचा संदेश लिहिण्यात आला होता.

यापूर्वीही अशीच घटना घडली होतीपाकिस्तान आणि अफगाणिस्तान सामना सुरु होता. यावेळी मैदानावरून एक अनधिकृत विमान गेले. या विमानावर 'जस्टिस फॉर बलूचिस्तान' हे शब्द मोठ्या अक्षरांत लिहिले गेले होते. हे शब्द दोन्ही देशांतील चाहत्यांनी पाहिले आणि त्यांच्यामध्ये जोरदार मारामारी सुरु झाली.

टॅग्स :वर्ल्ड कप 2019क्विन्टन डि कॉकद. आफ्रिकाआॅस्ट्रेलिया