Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs SL, 1st T20I : पाऊस थांबला, जाणून घ्या सामना कधी व किती षटकांचा होणार

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात पावसानं खोडा घातला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 20:40 IST

Open in App

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात पावसानं खोडा घातला आहे. नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूनं लागला आणि विराट कोहलीनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, त्यानंतर पावसानं एन्ट्री मारली आणि सामना सुरू होण्यास विलंब झाला. पावसाच्या दमदार एन्ट्रीनं चाहते निराश झालेले पाहायला मिळाले. 

2020 या वर्षातील पहिल्याच सामन्याची सर्वांना उत्सुकता लागली होती. या मालिकेतून जसप्रीत बुमराह आणि शिखर धवन पुनरागमन करणार होते. बुमराहच्या पुनरागमनाकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. कारण, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी बुमराहनं दुखापतीमुळे माघार घेतली होती. त्यानंतर तब्बत तीन महिन्यांनी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता. 

तासभर धुमाकूळ घातल्यानंतर पावसानं विश्रांती घेतली, परंतु तोपर्यंत खेळपट्टीचा चांगलाच बोऱ्या वाजला होता. रात्री 8.15 वाजता पंचांनी खेळपट्टीची पाहणी केली. त्यात ती ओली असल्याचे जाणवले. त्यामुळे 9 वाजता पुन्हा खेळपट्टीची पाहणी केली गेली. पण, 8.13 वाजता पुन्हा पाऊस सुरू झाला. पंधरा मिनिटानंतर पाऊस थांबला. त्यामुळे सामना होण्याची चिन्ह दिसत आहेत. 9 वाजता खेळपट्टीची पाहणी केल्यानंतर सामना खेळवण्याचा निर्णय झाला, तर किमान 13-13 षटकांचा सामना खेळवण्यात येऊ शकतो...

 

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकापाऊस