भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात पावसानं खोडा घातला. नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूनं लागला आणि विराट कोहलीनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, त्यानंतर पावसानं एन्ट्री मारली. पावसाच्या दमदार एन्ट्रीनं चाहते निराश झाले. पावसाचा लपंडाव सुरूच राहिला. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली दोन वेळा पंचांसोबत खेळपट्टीची पाहणी करण्यासाठी मैदानावर उतरला. पावणेदहा वाजता जेव्हा विराट कोहली पंचांसोबत खेळपट्टीची पाहणी करण्यासाठी मैदानावर आला त्यावेळी तो नाखुश दिसला.
तासभर धुमाकूळ घातल्यानंतर पावसानं विश्रांती घेतली, परंतु तोपर्यंत खेळपट्टीचा चांगलाच बोऱ्या वाजला होता. रात्री 8.15 वाजता पंचांनी खेळपट्टीची पाहणी केली. त्यात ती ओली असल्याचे जाणवले. त्यामुळे 9 वाजता पुन्हा खेळपट्टीची पाहणी केली गेली. पण, 8.13 वाजता पुन्हा पाऊस सुरू झाला. पंधरा मिनिटानंतर पाऊस थांबला. त्यामुळे सामना होण्याची चिन्ह दिसत होती. पण, खेळपट्टी ओली असल्यानं कोहलीनं नाराजी प्रकट केली. पंचांनी खेळपट्टीची पाहणी केल्यानंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सामनाधिकारी डेव्हिड बून यांच्याशी चर्चा केली.
IND vs SL,1st T20I : पहिल्या सामन्यात पावसाची एन्ट्री; मुंबई इंडियन्सनं तयार केलं स्पेशल गाणं...
IND vs SL : चौकार, षटकाराचे पोस्टर Not Allow; बीसीसीआयचा निर्णय, जाणून घ्या कारण...
IND vs SL : विराट कोहलीला चाहत्याचं अनोखं गिफ्ट; जुन्या मोबाईलपासून बनवलं खास चित्र