Join us
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; सामना रद्द होण्यापूर्वीच खेळाडूंनी सोडलं होतं मैदान, चाहत्यांची फसवणूक

क्रिकेट चाहते भर पावसातही सामना सुरू होईल या आशेनं स्टेडियमवरच होते

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 19:42 IST

Open in App

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातला पहिला ट्वेंटी-20 सामना पावसामुळे रद्द करावा लागला. सायंकाळी 6.30 वाजता नाणेफेक झाल्यानंतर लगेलच पावसाचे आगमन झाले. जवळपास तासाभरानंतर पावसानं काही काळ विश्रांती घेतली. पण, त्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटांनी त्यानं पुन्हा एन्ट्री घेतली. एवढ्या वेळात खेळपट्टीचं व्हायचं तितकं नुकसान झालं होत आणि अखेरीस रात्री 9.30 वाजता अखेरची पाहणी केल्यानंतर सुमारे दहा वाजता सामना रद्द करण्यात आल्याची घोषणा केली गेली.  सामना सुरु होईल या आशेनं चाहते भर पावसातही स्टेडियमवरच उपस्थित होते, परंतु ज्यांच्यासाठी ते मैदानावर होते, ते क्रिकेटपटू 9 वाजताच स्टेडियम सोडून हॉटेलमध्ये परतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शुभसंकेत! यंदा टीम इंडियाचे ट्वेंटी-20 वर्ल्ड कप जिंकण्याचे चान्स वाढले, जाणून घ्या कसे

आसाम क्रिकेट असोसिएशनचे सचिन देवाजित सैकिया यांनी ही धक्कादायक बाब समोर आणली. चेत्तीथोडी शमशुद्दीन, नितीन मेनन, अनिल चौधरी आणि मॅच रेफरी डेव्हिड बून यांनी 9.30 वाजता खेळपट्टीची पाहणी केली. मात्र, बहुतांश खेळाडू 9 वाजताच स्टेडियम सोडून निघून गेले होते, असे सैकिया यांनी IANSला सांगितले. ते म्हणाले,''हे रहस्यच आहे. सामना रद्द झाल्याची घोषणा सुमारे 9.54 वाजता केली, परंतु बहुतांश खेळाडू 9 वाजताच स्टेडियम सोडून माघारी परतले होते. चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागू नये म्हणून पाहणी करण्याची रणनीती आखली गेली. हा शिष्टाचार पाळावा लागतो. मी तुम्हाला कटू सत्य सांगतोय.''

लज्जास्पद! खेळपट्टी सुकवण्यासाठी हेअर ड्रायर, इस्त्रीबरोबर 'या' गोष्टींचा केला वापर

सामनाधिकाऱ्यांनी ग्राऊंड्समनला सूचना केल्या होत्या की,''8.45 पर्यंत खेळपट्टी तयार करा, अन्यथा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला जाईल.'' सैकिया म्हणाले,''एक तास - तीन मिनिटं मुसळधार पाऊस पडला. पंचांनी आम्हाला 8.45 पर्यंत खेळपट्टी सुकवा अन्यथा सामना रद्द करण्यात येईल, असे सांगितले होते. त्यांनी ग्राऊंड्समनला 57 मिनिटे दिली होती. आम्हाला अधिक वेळ मिळाला असता, तर आम्ही यशस्वीपणे कामगिरी केली असती.''

बीसीसीआयचं नाक कापलं; पाऊस नाही तर 'या' कारणांमुळे रद्द झाला पहिला सामना

ते पुढे म्हणाले,''हा अवकाळी पाऊस होता. जानेवारीत गुवाहाटी येथे पाऊस पडत नाही. शनिवारीही पाऊस पडला होता, परंतु आम्ही मैदान तयार केले. पण, सामन्याच्या दिवशी पुन्हा पाऊस पडला अन् खेळखंडोबा झाला.''

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकापाऊसबीसीसीआय