Join us

India vs South Africa : पराभवानंतर कोहली म्हणतो... ही आमची रणनीती, ट्वेंटी-20 वर्ल्ड कपसाठीची चाचपणी

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉकच्या दमदार फटकेबाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघाने तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात 9 विकेट्स राखून भारताला पराभूत केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 09:25 IST

Open in App

बंगळुरू, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉकच्या दमदार फटकेबाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिका संघाने तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात 9 विकेट्स राखून भारताला पराभूत केले. या विजयाबरोबर आफ्रिकेनं मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. भारताचे 135 धावांचे लक्ष्य 16.5 षटकांत पार केले. डी कॉकने नाबाद 79 ( 52 चेंडू, 6 चौकार व 5 षटकार) धावा केल्या. त्याला रीझा हेंड्रीक्स ( 28) आणि टेंबा बवुमा (27*) चांगली साथ दिली. भारताकडून शिखर धवन ( 36) हा सर्वोत्तम कामगिरी करणारा फलंदाज ठरला. 

या सामन्यानंतर कोहलीनं सांगितलं की,'' ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचा सामना करण्यापूर्वी आम्हाला प्रथम फलंदाजी करण्याच्या रणनीतीचे अवलंबन करून पाहायचे आहे. प्रत्येक परिस्थिचा सामना करण्याची मानसिकता तयार करायला हवी. अशा प्रकारच्या सामन्यात अनेकदा आमची रणनीती फसलेली आहे. त्यामुळे अशा प्रसंगाचा सामना करायची सवय लागायला हवी. त्यातूनच सुधारणा होत राहणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. पहिल्या डावात खेळपट्टी त्यांना मदतगार ठरली आणि आम्ही सामन्याचा अंदाज बांधण्यात अपयशी ठरलो.''

तो पुढे म्हणाला,''ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करणे सोपं असतं. वन डे क्रिकेटमध्ये गोलंदाजांना सामन्यात कमबॅक करण्याची संधी मिळते, परंतु ट्वेंटी-20त 40-50 धावांची भागीदारी तुमच्या हातून सामना हिरावून घेतो. एक चांगली भागीदारी अन् दोनशे धावाही कमी पडतात. संतुलित संघासाठी प्रयोग केले जाणार आणि लवकरच योग्य संघ निवडला जाईल. या सर्व खेळाडूंनी स्थानिक क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. हा खूप युवा संघ आहे. त्यामुळे त्यांना पुरेसा वेळ देणे गरजेचे आहे. आज आम्ही नवव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी केली. या बाबीला बलशाली बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे.''

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाविराट कोहलीरिषभ पंत