India vs South Africa : रिषभ पंतला 'ती' म्हणाली 'I Love You' अन्... पाहा Video

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारतीय संघाने आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर ट्वेंटी-20 मालिका विजयाची संधी गमावली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 11:41 IST2019-09-23T11:40:37+5:302019-09-23T11:41:45+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India vs South Africa : Rishabh Pant blushes after a fan-girl shouts 'I Love You', Watch Video | India vs South Africa : रिषभ पंतला 'ती' म्हणाली 'I Love You' अन्... पाहा Video

India vs South Africa : रिषभ पंतला 'ती' म्हणाली 'I Love You' अन्... पाहा Video

बंगळुरू, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारतीय संघाने आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर ट्वेंटी-20 मालिका विजयाची संधी गमावली. मालिकेत 1-0 असे आघाडीवर असूनही टीम इंडियाला 1-1 अशी बरोबरी मानावी लागली. आफ्रिकेनं तिसऱ्या सामन्यात 9 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. कर्णधार क्विंटन डी कॉकच्या फटकेबाजीनं भारताच्या मालिका विजयाचे स्वप्न धुळीस मिळवले. भारताकडून शिखर धवन वगळता अन्य फलंदाजांनी घोर निराशा केली. रिषभ पंत पुन्हा एकदा अपयशी ठरल्यानं त्याच्यावर टीका होताना दिसत आहे. मैदानावर पंतला अपयश येत असले तरी मैदानाबाहेर त्याचा बोलबाला आहे. तिसऱ्या सामन्यापूर्वी चाहत्यांना ऑटोग्राफ देत असताना चक्क एक मुलगी पंतला I Love You म्हणाली आणि त्यानंतर काय घडलं? 

क्विंटन डी कॉक आणि रिझा हेंड्रीक्स यांनी आफ्रिकेला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या 6 षटकांत बिनबाद 43 धावा केल्या. हार्दिक पांड्यानं 11व्या षटकात भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानं हेड्रीक्सला बाद केले. कोहलीनं सुपर कॅच घेत हेंड्रीक्सला माघारी पाठवले. क्विंटन डी कॉकनं 39 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी रचलेल्या पायावर आफ्रिकेनं विजय साजरा केला. रॉयल चॅलेंजर बंगळुरूच्या घरच्या मैदानावर विराट कोहलीला पराभव पत्करावा लागला. आफ्रिकेनं 9 विकेट राखून हा सामना जिंकला. डी कॉकने 52 चेंडूंत 6 चौकार व 5 षटकारांसह नाबाद 79 धावा केल्या. 

या सामन्यापूर्वी बंगळुरु येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर घडलेला हा प्रसंग आहे. 21 वर्षीय पंत चाहत्यांना ऑटोग्राफ देत होता. तेव्हा एक मुलगी पंतला I Love You म्हणाली आणि पंत लाजला... त्याच्या लाजऱ्या हसूचा व्हिडीओ मुलीनं सोशल मीडियावर शेअर केला.  


 

Web Title: India vs South Africa : Rishabh Pant blushes after a fan-girl shouts 'I Love You', Watch Video