मोहाली, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : धर्मशाला येथे पहिली लढत पावसामुळे रद्द झाल्यानंतर भारतीय संघ बुधवारी येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात विजयासह तीन लढतींच्या मालिकेत आघाडी घेण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतसाठी ही लढत महत्त्वाची आहे. कारण गेल्या काही सामन्यांमध्ये त्याला संधीचा लाभ घेण्यात अपयश आले. त्याच्यावर चांगली कामगिरी करण्याचे दडपण वाढत आहे.
LIVE
Get Latest Updates
10:18 PM
भारताचा सात विकेट्स राखून विजय
09:56 PM
रिषभ पंत चार धावांवर आऊट
09:33 PM
जोडी जमली रे...
कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर शिखर धवन यांनी भारताचा डाव सावरला. या दोघांनी भारता 9 षटकांमध्ये 1 बाद 72 अशी मजल मारून दिली.
08:40 PM
भारतापुढे विजयासाठी 150 धावांचे आव्हान
08:22 PM
दक्षिण आफ्रिकेला चौथा धक्का
07:57 PM
जडेजाने मिळवला पहिला बळी
07:53 PM
क्टिंटन डीकॉक आऊट
07:52 PM
क्टिंटन डीकॉकचे अर्धशतक
07:47 PM
दक्षिण आफ्रिका 10 षटकांत 1 बाद 78
दक्षिण आफ्रिकेने 10 षटकांमध्ये 1 फलंदाज गमावत 78 धावा केल्या.
07:19 PM
दीपक चहरने भारताला मिळवून दिले पहिले यश
06:42 PM
मोहालीतील सामन्यासाठीचा हा आहे भारतीय संघ
06:38 PM
टॉस झाल्यावर कोहली नेमके काय बोलला, पाहा हा व्हिडीओ...
06:36 PM
भारताने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारली
भारताने मोहाली येथील दुसऱ्या सामन्यात नाणेफेक जिंकली आहे. नाणेफेक जिंकत भारताने दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले आहे.
06:25 PM
सामन्यापूर्वी भारताचा कसून सराव, पाहा व्हिडीओ...
06:20 PM
दुसऱ्या ट्वेन्टी-20 सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज