धर्मशाला, भारत आणि दक्षिण अफ्रिका : भारत आणि दक्षिण अफ्रिकेच्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्याला आज (रविवार) पासून सुरुवात होत आहे. धर्मशाला येथे पहिला ट्वेंटी-20सामना खेळवण्यात येणार असून वेस्ट इंडिजला त्यांच्याच घरच्या प्रेक्षकांसमोर धुळ चालणारी टीम इंडिया आता मायदेशात दक्षिण आफ्रिकेचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. आफ्रिकेचा संघ तीन ट्वेंटी-20 आणि तीन कसोटी सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर आला आहे. मात्र धर्मशाला येथे गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडतो आहे. तसेच आज देखील पावसाची शक्याता असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
संभाव्य संघ
भारत : विराट कोहली ( कर्णधार) , रोहित शर्मा, लोकेश राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, खलील अहमद, दीपक चहर, नवदीन सैनी.
दक्षिण आफ्रिका : क्विंटन डि कॉक (कर्णधार), रॉसी व्हॅन डेर डुसेन, तेंबा बावुमा, ज्युनिअर डाला, ब्योर्न फोर्चुन, बुरान हेंड्रीक्स, रीजा हेंड्रीक्स, डेव्हिड मिलर, एनरिच नोर्जे, अँडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरीयस, कागिसो रबाडा, तरबेझ शम्सी, जॅन जान स्मट्स.
08:53 PM
India vs South Africa, 1st T20I: किती मिनिटांमध्ये केला सामना रद्द, जाणून घ्या...
08:03 PM
पहिला सामना पावसामुळे रद्द
06:48 PM
जोरदार पावसामुळे टॉसला होणार उशिर
06:22 PM
धर्मशाला मैदानातील पावसाचे पाणी काढण्याचे जोरदार प्रयत्न, पाहा व्हिडीओ...