India vs South Africa, 1st Test : कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या संघानं कर्णधार टेम्बा बावुमाच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियासमोर १२४ धावांचे टार्गेट सेट केले आहे. ही धावसंख्या अल्प वाटत असली तरी कोलकाताच्या मैदानात हे एक मोठं आव्हान आहे. त्यात भारतीय संघाकडून शुभमन गिल मैदानात उतरणार नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला हा सामना जिंकण्यासाठी फक्त ९ विकेट्स घ्याव्या लागतील.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
टेम्बा बावुमाची नाबाद फिफ्टी, सिराजनं एका ओव्हरमध्ये दोन विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेचा खेळ केला खल्लास
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने तिसऱ्या दिवशी ७ बाद ९३ धावावरुन खेळाला पुढे सुरुवात केली. टेम्बा बावुमानं कॉर्बिन बॉशच्या साधीनं आठव्या विकेटसाठी ७९ चेंडूत ४४ धावांची भागीदारी रचत दक्षिण आफ्रिकेच्या धावफलकावर आव्हानात्मक धावसंख्या उभारली. ही या सामन्यातील सर्वोच्च भागीदारी ठरली. टेम्बा बावुमानं १३६ चेंडूत ५५ धावांची नाबाद खेळी केली. तो या सामन्यात सर्वाधिक चेंडू खेळण्यासोबत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. बुमराहनं कॉर्बिन बॉशला माघारी धाडल्यावर सिराजनं एकाच षटकात दोन विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या डावात १५३ धावांवर रोखलं.
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
चौथ्या डावात अल्पधावसंख्येचा यशस्वी पाठलाग अन् बचाव करण्याचा रेकॉर्ड
कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात याआधी २००४ मध्ये भारतीय संघाने ११७ धावांचा यशस्वी पाठलाग करत दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना जिंकला होता. यावेळी भारतीय संघाला यापेक्षा ६ धावांचे अधिक टार्गेट मिळाले आहे. मागील रेकॉर्डमध्ये सुधारणा करत भारतीय संघ कसोटी जिंकण्याचा डाव साधणार का? ते पाहण्याजोगे असेल. कोलकाताच्या मैदानात अल्प धावसंख्येचा बचाव करण्याचा विक्रमही भारतीय संघाच्या नावे आहे. १९७२-७३ मध्ये १९२ धावांचा बचाव करत भारतीय संघाने कसोटी सामान जिंकला होता.
टेम्बा बावुमाचा रेकॉर्ड टीम इंडियाच्या विजयाआड येणार?
पहिल्या दोन दिवसांच्या खेळात भारतीय संघ कोलकाता कसोटी सामन्यात मजबूत स्थितीत दिसत होता. पण दुसऱ्या डावात टेम्बा बावुमानं अर्धशतकी खेळीसह सामन्यात नवे ट्विस्ट आणले आहे. दोन्ही संघांना हा सामना जिंकण्याची संधी आहे. दक्षिण आफ्रिकेची जमेची बाजू फक्त टेम्बा बावुमाची फिफ्टी नाही तर त्याच्या नेतृत्वाखालील आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या संघाने एकही सामना गमावलेला नाही. १० सामन्यात टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ९ सामने जिंकले असून एक सामना अनिर्णित राखला आहे. हा सामना अनिर्णित राहणार नाही, हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे बावुमाचा विक्रम टीम इंडियाच्या विजया आड येणार का? तेही पाहण्याजोगे असेल.