India vs South Africa Womens World Cup 2025 Final : महिला विश्वचषक २०२५ स्पर्धेतील नवी मुंबईत रंगलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर २९९ धावांचे टार्गेट सेट केले आहे. भारताकडून सलामीची बॅटर शफाली वर्मा हिच्यानंतर दीप्ती शर्मानं अर्धशतकी खेळी केली. शफालीसह स्मृती मानधनाने पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचत संघाला दमदार सुरुवात करून दिली होती. त्यामुळे भारतीय संघ फायनलची लढाई ३०० पारची करेल, असे वाटत होते. पण अखेरच्या १० षटकात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने उत्तम गोलंदाजी करत भारतीय संघाला निर्धारित ५० षटकात ३ विकेट्स घेत २९८ धावांवर रोखले.
शफाली वर्माचं शतक हुकलं
फायनल लढतीत नाणेफेक गमावल्यावर पहिल्यांदा फलंदाजी करण्याची वेळ आल्यावर भारतीय संघाकडून स्मृती मानधना आणि शफाली वर्मा या दोघींनी संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली. पहिल्या विकेटसाठी दोघींनी १०४ धावांची भागीदारी रचली. स्मृती मानधना ५८ चेंडूत ४५ धावा करून माघारी फिरल्यावर शफालीनं जेमिमासह अर्धशतकी भागीदारी रचली. पण जेमिला मोठी खेळी करता आली नाही. शफाली वर्माचं शतक अवघ्या १३ धावांनी हुकलं. ८७ धावा करून ती पॅव्हेलियनमध्ये परतली.
हरमनप्रीत-दीप्ती जोडी जमली, पण...
कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दीप्ती दोघींनी चौथ्या विकेटसाठी ५६ चेंडूत ५२ धावांची भागीदारी रचली. ही जोडी सेट झालीये असे वाटत असताना हरमनप्रीत कौरच्या रुपात टीम इंडियाला मोठा धक्का बसला. अखेरच्या षटकात दीप्तीनं रिचा घोषच्या साथीनं ३५ चेंडूत ४७ धावांची उपयुक्त भागीदारी रचली. .
Web Summary : India set a 299-run target for South Africa in the Women's World Cup final. Shafali and Smriti's century partnership initially promised a 300+ score. South Africa's strong bowling in the final 10 overs restricted India to 298 in 50 overs.
Web Summary : महिला विश्व कप के फाइनल में भारत ने दक्षिण अफ्रीका को 299 रनों का लक्ष्य दिया। शैफाली और स्मृति की शतकीय साझेदारी ने शुरुआत में 300+ स्कोर का वादा किया। दक्षिण अफ्रीका की कसी हुई गेंदबाजी से भारत 50 ओवरों में 298 रन ही बना सका।