India vs South Africa 2nd Test SA 489 All Out 1st Innings : गुवाहटी कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी सेनुरन मुथुसामीची कडक शतकी खेळी मार्को यान्सेन याने पेश केलेला तुफान फटकेबाजीचा नजराणा याच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने पहिल्या डावात ४८९ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ६ बाद २४७ धावांवरून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. तासाभरात भारतीय संघ अखेरच्या चार विकेट्स घेऊन पहिल्या डावाला सुरुवात करेल असे अपेक्षित होते. पण मुथुसामी आणि मार्कोच्या रुपात एक सोडून दोन आउट ऑफ सिलॅबस प्रश्नांमुळे गुवाहाटी कसोटी सामन्यात भारतीय संघासमोर मोठं आव्हान उभे राहिले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुथुसामीची सेंच्युरी! मोर्कोच शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं
मुथुसामी आणि काइल व्हेरेइन या जोडीनं दक्षिण आफ्रिकेच्यासंघाकडून सातव्या विकेटसाठी २३६ चेंडूत ८८ धावांची खेळी केली. काइल व्हेरेइन १२२ चेंडूत ४५ धावा करून परतल्यावर मुथुसामी आणि मार्को यान्सेन जोडी जमली. या दोघांनी आठव्या विकेटसाठी १०६ चेंडूत ९७ धावांची भागीदारी रचली. मुथुसामी याने कारकिर्दीतील पहिले शतक झळकावताना २०६ चेंडूत १०९ धावा केल्या. मार्को यान्सेनच शतक अवघ्या ७ धावांनी हुकले. कुलदीप यादवनं त्याची विकेट घेत दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव संपुष्टात आणला.
IND vs SA : कोण आहे Senuran Muthusamy? कसोटी पदार्पणात 'विराट' विकेट; भारताशी खास कनेक्शन अन् बरंच काही
भारताकडून गोलंदाजीत कुलदीप यादवचा 'चौकार'
दुसऱ्या दिवसाच्या खेळातील पहिले सत्र विकेट लेस राहिल्यावर दुसऱ्या सत्रात रवींद्र जडेजानं काइल व्हेरेइनच्या रुपात दक्षिण आफ्रिकेला सातवा धक्का दिला. त्याने १२२ चेंडूत ५ चौकाराच्या मदतीने ४५ धावा केल्या. मोहम्मद सिराजनं शतकवीर सेनुरन मुथुसामी याला १०९ धावांवर बाद केले. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या सायमन हार्मरच्या रुपात जसप्रीतबुमराहनं टीम इंडियाला नववे यश मिळवूनदिले. कुलदीप यादवनं मार्को यान्सेन याला ९३ धावांवर बाद करत दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ४८९ धावांवर आटोपला. पहिल्या डावात कुलदीप यादवनं भारताकडून सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. यात पहिल्या दिवसाच्या खेळातील ३ विकेट्सचा समावेश आहे. याशिवाय जसप्रीत बुमराह, सिराज आणि जडेजा यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.