India vs South Africa : नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूनं

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकली आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2018 13:40 IST2018-02-04T13:35:13+5:302018-02-04T13:40:21+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India vs South Africa: India win the toss and elect to field | India vs South Africa : नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूनं

India vs South Africa : नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूनं

सेंच्युरियन - दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकली आहे. नाणेफेक जिंकून विराटनं  प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघात या सामन्यासाठी कोणताही बदल करण्यात आला नाही.

भारत या मालिकेत 1-0 असा आघाडीवर आहे. पहिला एकदिवसीय सामना सहज जिंकल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. भारतीय संघ मालिकेत आघाडी घेण्याच्या इराद्याने उद्या मैदानात उतरेल. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघाला दुखापतीने ग्रासले आहे. कर्णधार फाफ डू प्लेसिस दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. उर्वरित एकदिवसीय सामन्यांसाठी एडेन मार्कराम याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

रहाणेने वाँडरर्स कसोटीतील फॉर्म कायम राखत शानदार फलंदाजी केली आणि पहिल्या दोन कसोटी सामन्यात त्याला वगळणे मोठी चूक असल्याचे सिद्ध केले. त्यानेही सहज सुंदर फलंदाजी केली. कोहली-रहाणे जोडी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीचे पिसे विखुरताना बघितल्यानंतर आनंद झाला.
डर्बनच्या तुलनेत सेंच्युरियनची खेळपट्टी वेगवान आहे. त्याचसोबत हा सामना दिवसा खेळला जाणार आहे. भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेच्या मा-याची चांगली कल्पना असून ते यजमान संघाला मालिकेत पुनरागमन करण्याची संधी देणार नाहीत. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमध्ये सहा वन-डे सामन्याची मालिका खेळवली जात आहे. 

असा आहे भारतीय संघ: रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेन्द्र चहल 

Web Title: India vs South Africa: India win the toss and elect to field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.