गुवाहाटीच्या मैदानातील दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवण्यासाठी सलामी जोडीनं ८२ धावांची भागीदारीही रचली. पण चहापानाआधी आणि त्यानंतर धावफलकावार ८२ धावा असताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे दोन्ही सलामीवीर तंबूत परतले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!सलामीवीर माघारी फिरल्यावर कर्णधार टेम्बा बावूमा आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी तग धरून बॅटिंग केली. या चोघांनी ८० पेक्षा अधिक चेंडूच सामना केला. पण एकालाही अर्धशतक झळकवता आले नाही. कुलदीप यादवनं पहिल्या दिवशीच आपल्या फिरकीची जादू दाखवून देताना भारतीय संघाकडून सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. परिणामी चांगली सुरुवात केल्यावर दक्षिण आफ्रिकेचा संघ सामन्यात मागे पडला. पहिल्या दिवसाअखेर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ६ विकेट्सच्या मोबदल्यात २४७ धावा केल्या होत्या. सेनुरन मुथुसामी २५ (४५) आणि काइल व्हेरेइन १ (४) धावांवर खेळत होते.
Web Summary : South Africa, after winning the toss, reached 247/6 on Day 1. Openers started strong, but Kuldeep's 3 wickets shifted momentum. Four batsmen showed resistance, yet none scored a half-century, leaving SA trailing.
Web Summary : टॉस जीतकर दक्षिण अफ्रीका ने पहले दिन 247/6 रन बनाए। सलामी बल्लेबाजों ने अच्छी शुरुआत की, लेकिन कुलदीप के 3 विकेटों ने गति बदल दी। चार बल्लेबाजों ने प्रतिरोध दिखाया, फिर भी कोई अर्धशतक नहीं बना सका, जिससे SA पिछड़ गया।