IND vs SA 2nd Test, Day 1 Stumps : कुलदीपचा जलवा! पाहुण्या संघाकडून चौघांनी तग धरला, पण...

पहिल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २०० पारचा आकडा पार केला, पण अर्धा संघही तंबूत परतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 16:59 IST2025-11-22T16:58:35+5:302025-11-22T16:59:12+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
India vs South Africa Highlights 2nd Test Day 1 Kuldeep Yadav Takes 3 Wickets As India Reduce SA To 247 Off 6 At Stumps | IND vs SA 2nd Test, Day 1 Stumps : कुलदीपचा जलवा! पाहुण्या संघाकडून चौघांनी तग धरला, पण...

IND vs SA 2nd Test, Day 1 Stumps : कुलदीपचा जलवा! पाहुण्या संघाकडून चौघांनी तग धरला, पण...

IND vs SA 2nd Test, Day 1 Stumps :  गुवाहाटीच्या मैदानातील दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने चांगली सुरुवात केली.  पण भारतीय गोलंदाजीसमोर पहिल्यांदा बॅटिंग करताना दिवस खास करण्यात पाहुणा संघ कमी पडला.  पहिल्या दिवसाअखेर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ६ विकेट्सच्या मोबदल्यात २४७ धावा केल्या होत्या. सेनुरन मुथुसामी २५ (४५) आणि काइल व्हेरेइन १ (४) धावांवर खेळत होते.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

दक्षिण आफ्रिकेनं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये गमावल्या दोन विकेट्स

पहिल्यांदा फलंदाजी करताना मार्करम आणि रिकल्टन या सलामी जोडीनं ८२ धावांची भागीदारी रचली. पण चहापानाआधी जसप्रीत बुमराहनं ही जोडी फोडली. सेट झालेल्या मार्करमला तंबूचा रस्ता दाखवत बुमराहनं टीम इंडियाला मोठा दिलासा दिला. चहापानाच्या ब्रेकनंतर एकाही धावेची भर  घालू न देता कुलदीप यादवनं दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या सलामीवीराला आपल्या जाळ्यात अडकवले. बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट मिळवत टीम इंडियाने सामन्यावर आपली पकड मजबूत केली.  पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात भारतीय संघाला प्रत्येकी एक एक विकेटच मिळाली. पण यादरम्यान अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत भारतीय संघाने धावगतीवर अंकूश लावत दक्षिण आफ्रिकेच्या बॅटर्सवरील दबाव वाढवण्यात यश मिळवले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

बावुमा-स्टब्स यांनीही सेट झाल्यावर गमावली विकेट

दोन्ही  सलामीवीर माघारी फिरल्यावर कर्णधार टेम्बा बावूमा आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी तग धरून बॅटिंग केली. दोघांनी वैयक्तिक धावसंख्येचा आकडा ४० धावसंख्येचा पार नेला. पण यातील एकालाही अर्धशतकी डाव साधता आला नाही. टेम्बा बावुमा ९२ चेंडूचा सामना करून ४१ धावांवर बाद झाला. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर यशस्वी जैस्वालनं त्याचा सुंदर झेल टिपला. कुलदीप यादवनं ट्रिस्टन स्टब्सला अर्धशतकाच्या उंबरठ्यावर बाद करत पहिल्या दिवसाच्या खेळात तिसरी विकेट खात्यात जमा करत दिवस गाजवला. 

VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...

कुलदीपचा जलवा! पहिल्या दिवसाच्या खेळात बुमराह-सिराज अन् जड्डूनंही उघडलं विकेटचं खाते

मार्करम, रिकल्टन या दोन सलामीवीरांशिवाय बावुमा आणि स्टेब्सनं ८० पेक्षा अधिक चेंडूचा सामना केला. पण एकालाही अर्धशतक झळकवता आले नाही.  परिणामी चांगली सुरुवात केल्यावर दक्षिण आफ्रिकेचा संघ सामन्यात मागे पडला. भारतीय संघासाठी ही जमेची बाजू ठरली. भारतीय संघाकडून कुलदीप यादवनं सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.  याशिवाय जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी १-१ विकेट्स आपल्या खात्यात जमा केली.  

Web Title : कुलदीप चमके! दक्षिण अफ़्रीकी बल्लेबाजों का प्रतिरोध, पर भारत आगे।

Web Summary : टॉस जीतकर दक्षिण अफ्रीका ने पहले दिन 247/6 रन बनाए। सलामी बल्लेबाजों ने अच्छी शुरुआत की, लेकिन कुलदीप के 3 विकेटों ने गति बदल दी। चार बल्लेबाजों ने प्रतिरोध दिखाया, फिर भी कोई अर्धशतक नहीं बना सका, जिससे SA पिछड़ गया।

Web Title : Kuldeep shines! SA batsmen resist, but India gains upper hand.

Web Summary : South Africa, after winning the toss, reached 247/6 on Day 1. Openers started strong, but Kuldeep's 3 wickets shifted momentum. Four batsmen showed resistance, yet none scored a half-century, leaving SA trailing.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.