Join us

India Vs South Africa, 3rd Test : भारताचा मालिका विजय

या विजयासह भारताने ही मालिका 3-0 अशा फरकाने जिंकली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 09:47 IST

Open in App

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताने तिसऱ्या कसोटी सामन्यात तब्बल एक डाव आणि 202 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने ही मालिका 3-0 अशा फरकाने जिंकली आहे.

भारताला सामन्याच्या चौथ्या दिवशी विजयासाठी फक्त दोन विकेट्सची गरज होती. भारताचा फिरकीपटू शाहबाझ नदीमने दक्षिण आफ्रिकेच्या दोन फलंदाजांना बाद करत भारताला विजय मिळवून दिला. भारताचा हा मालिकेतील तिसरा विजय ठरला. यापूर्वी भारताने दोन्ही सामने जिंकले होते.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका